KBC 14 : ‘या’ प्रश्नाचं उत्तर दिलं असतं, तर कोल्हापूरकर कविता यांनी जिंकले असते ७.५ कोटी!

WhatsApp Group

KBC 14 Kavita Chawla : जेव्हापासून सोनी टीव्हीचा क्विझ रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ सुरू झाला आहे, तेव्हापासून या शोमध्ये येण्याचं प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या या शोचा १४वा सीझन सुरू आहे. शोमध्ये आत्तापर्यंत अनेक स्पर्धक आले आणि गेले, पण आजपर्यंत कोणीही करोडपती झालेलं नव्हतं. मात्र, आता सीझनला पहिला करोडपती मिळाला आहे. मात्र, हा स्पर्धक साडेसात कोटींच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही.

महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या राहणाऱ्या कविता चावला ‘कौन बनेगा करोडपती १४’ च्या पहिल्या करोडपती ठरल्या. कविता एक गृहिणी आहेत आणि केबीसीमध्ये येण्यासाठी त्यांनी जवळपास २१ वर्षे मेहनत केली. गेल्या एपिसोडमध्ये त्यांनी १ कोटी रुपये जिंकले. मात्र, ७.५ कोटींच्या प्रश्नावर त्यांनी खेळ सोडला.

हेही वाचा – कोल्हापूर हादरलं..! तरुणानं व्हॉटसॲप स्टेटस ठेऊन ‘तिचा’ खून केला आणि स्वत:लाही संपवलं

७.५ कोटींचा प्रश्न

कविता चावलांसाठी आनंदाची बातमी होती, की त्यांनी एक कोटी रुपये जिंकले आहेत. बिग बींनी त्यांना १७व्या म्हणजे ७.५ कोटी रुपयांसाठी असा प्रश्न विचारला, “प्रथम श्रेणी पदार्पणात द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय असलेल्या गुंडप्पा विश्वनाथनं कोणत्या संघाविरुद्ध ही कामगिरी केली होती?” या प्रश्नाला पर्याय होते, सर्व्हिसेस, आंध्र, महाराष्ट्र आणि सौराष्ट्र. याचं उत्तर होतं आंध्र.

हेही वाचा – IPhone 14 Pro आणि IPhone 14 Pro Max मध्ये ‘मोठा’ प्रॉब्लेम..! घेण्यापूर्वी एकदा पाहा VIDEO

कविता या प्रश्नाचं उत्तर देऊ शकल्या नाहीत. त्यांच्याकडे कोणतीही लाइफलाइन उरली नव्हती आणि खूप विचार केल्यानंतर त्यांनी धोका न घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचं सर्वांनी कौतुक केले. करोडपती होऊन त्या घरी परतल्या.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment