Sharad Pawar : शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर जयंत पाटील यांना अश्रू अनावर; म्हणाले, “आता कुणाच्या नावाने…”

WhatsApp Group

Sharad Pawar : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आज मुंबईतील वाय.बी.चव्हाण केंद्रात आयोजित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करताना शरद पवार म्हणाले की, मी अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत आहे. दरम्यान, शरद पवार यांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जयंत पाटील यांनी अश्रू ढाळत पवारांना निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले. 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीची स्थापना केली

दुसऱ्याने जबाबदारी घ्यावी अशी माझी इच्छा आहे

शरद पवार यांनी मुंबईतील त्यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात मोठी घोषणा करून पुन्हा एकदा सर्वांना चकित केले. शरद पवार म्हणाले, ”पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मला दीर्घकाळ मिळाली. अध्यक्षपदाची जबाबदारी मी अनेक वर्षे सांभाळली. ही जबाबदारी दुसऱ्या कोणीतरी घ्यावी अशी माझी इच्छा आहे. आता मी अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा करताच राष्ट्रवादीच्या सर्व बड्या नेत्यांनी हात जोडण्यास सुरुवात केली. यावेळी समर्थकांनी पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. अलीकडेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी नेतृत्व बदलाची हीच योग्य वेळ असल्याचे संकेत दिले होते.”

हेही वाचा – Sharad Pawar : महाराष्ट्रात खळबळ..! शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

जयंत पाटील भावूक

पवाराच्या धक्कादायक निर्णयानंतर तेथे उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना रडू कोसळले. त्यांनी सुरुवातीला काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण भावनिक झालेले पाटील लगेच खाली बसले. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना धीर दिला. ”महाराष्ट्रात शरद पवारां च्या नावाने मत मागतो, पक्षाला मतें पवार साहेबांच्या नावाने मिळतात. आज पवार साहेबच बाजूला गेले तर कुणाच्या नावाने मत मागायचे?” असे पाटील म्हणाले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment