Best Police Units Award : महाराष्ट्रातील जालना जिल्हा पोलीस आणि नागपूर शहर पोलिसांनी २०२१ चा ‘बेस्ट पोलीस युनिट’ पुरस्कार पटकावला आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, समुदाय पोलिसिंग आणि विकासशील प्रशासन अशा विविध श्रेणींमध्ये राज्य पोलिसांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विजेत्यांची नावे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) कुलवंत सरंगल यांनी जाहीर केली. जालना पोलिसांना अ वर्ग आणि नागपूर पोलिसांना ब वर्गाच्या आधारावर पुरस्कार मिळाला आहे. पोलिसांच्या परिपत्रकानुसार, ६१०० पेक्षा कमी भारतीय दंड संहितेच्या केसेस असलेल्या पोलीस युनिट्सना ‘अ’ वर्गात ठेवले आहे, तर ६१०० पेक्षा जास्त आयपीसी केस असलेल्या पोलिस युनिट्सना ‘ब’ वर्गात ठेवण्यात आले आहे.
रायगड जिल्हा पोलीस द्वितीय…
‘अ’ वर्गात रायगड जिल्हा पोलिसांनी द्वितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट पोलीस तुकडीचा पुरस्कार पटकावला, तर सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांनी सत्र खटल्यातील दोषींसाठी सर्वोत्कृष्ट तुकडीचा पुरस्कार पटकावला. पोलिसिंगसाठी तंत्रज्ञानातील सर्वोत्कृष्ट युनिटसाठी बीड जिल्हा पोलीस आणि कम्युनिटी पोलिसिंग उपक्रमातील सर्वोत्तम युनिटसाठी गडचिरोली पोलिसांचा गौरव करण्यात आला.
हेही वाचा – प्रवाशानं महिलेच्या ब्लँकेटवर केली लघवी..! Air India च्या फ्लाइटमध्ये ‘घाणेरडा’ प्रकार
Maharashtra: Jalna and Nagpur Police win 'Best Police Units' award#Maharashtra #Jalna #Nagpur https://t.co/xpAVqHzhc9
— Mid Day (@mid_day) January 4, 2023
पुणे शहर पोलिसांना ‘हा’ पुरस्कार
ब वर्गात पुणे शहर पोलिसांनी द्वितीय क्रमांकाचा तर मीरा-भाईंदर-वसई विरार पोलिसांनी पोलिसिंगसाठी तंत्रज्ञानातील सर्वोत्कृष्ट युनिटचा पुरस्कार पटकावला. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दोन पुरस्कार पटकावले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस युनिट्सचे ४५ पूर्व-निवडलेल्या पॅरामीटर्सच्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन केले गेले आहे. जालना पोलीस दल औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत येते.