Jalgaon Policeman Dancing In A Tamasha : पोलीस कर्मचाऱ्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गणपती विसर्जनादरम्यान पोलिसांनी ताणतणाव विसरत नाचत असल्याचे आपण व्हिडिओंमधून पाहिले. पण आता एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळं त्यांना मोठी शिक्षा मिळाली. एक पोलीस कर्मचारी चक्क तमाशात नाचत होता. इतकंच नाही, तर तो पैसे ओवाळून टाकत असल्याचं दिसत आहे.
हा प्रकार जळगावातील असून यामुळे पोलीस दलाची नाचक्की होत असल्याच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन केलं आहे. महिनाभरापूर्वी जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द गावात तमाशाचा कार्यक्रम झाला. यात पोलीस उपनिरीक्षक भटू विरभान नेरकर यांनी नाच केला.
हेही वाचा – IND Vs AUS 1st T20 : 6,6,6..! शेवटच्या षटकात हार्दिक पंड्याचा धुमाकूळ; पाहा VIDEO
जळगावातील तमाशात पैसे उडवतानाचा पोलीस कर्मचाऱ्याचा VIDEO व्हायरल#Jalgaon #Police #vachamarathi #ViralVideo pic.twitter.com/cnBBUIutOF
— Vacha Marathi (@VachaMarathi) September 20, 2022
आरोपीच्या गावात तमाशा..!
गेल्या महिन्यात निवृत्तीनगरात भावेश पाटील या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणी खेडी खुर्द इथल्या भूषण रघुनाथ सपकाळे आणि आव्हाणे इथल्या मनीष नरेंद्र पाटील या दोन आरोपींना अटक करण्यात आली. यामधील भूषण रघुनाथ सपकाळे याच्या गावात हा तमाशाचा कार्यक्रम झाला. याच कार्यक्रमात पोलीस कर्मचाऱ्यानं एका सहकार्यासह नाच केला.