Jahnavi Killekar Insult Actor Paddy Kamble : महाराष्ट्रभर सध्या ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाची चर्चा आहे. यावेळी रितेश देशमुखच्या या नवख्या होस्टखाली शोने जबरदस्त टीआरपी मिळवला आहे. विविध स्वभावाची माणसं एका घरात आणून त्यात नवनवे फंडे आजमावून लोकांना उत्सुकतेत ठेवणं ही या शोची खासियत. त्यात भांडणं ही आलीच. यंदाच्या सीझनमध्ये लोकांच्या मनात राग निर्माण करणारी खेळाडू म्हणजे जान्हवी किल्लेकर. तिने नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा – खऱ्या आयुष्यातील टर्मिनेटर..! डोळा काढून बसवला कॅमेरा, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
शोमध्ये जान्हवीने महाराष्ट्राचे ज्येष्ठे अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. एका टास्कदरम्यान ती पॅडी यांना म्हणाली, ”आयुष्यभर ओव्हर अॅक्टिंग करुन करुन दमले, आता तीच ओव्हर अॅक्टिंग घरात दाखवत आहेत.” या वक्तव्यानंतर लोकांनी जान्हवीवर संताप व्यक्त केला आहे. याआधीही तिने वर्षा उसगांवर यांना मिळालेल्या पुरस्कारांची टिंगल केली होती.
ही जान्हवी किल्लेकर कोण समजते कोण स्वतःला.. बाहेर येऊन हिला काम करायचं नाही ए का? हिला एवढा कसला माज आहे..बाई game बद्दल बोल..हाकला अशा लोकांना जे आपल्या वरिष्टांच्या कामाचा आदर करत नाहीत.. Pady दादाने आयुष्य भर over acting केली याचा अर्थ काय आहे? @Riteishd@ColorsMarathi…
— Jyo_🥰 Smile_Always_❤️🔥💞 (@jyo285laksh) August 20, 2024
मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या प्रचंड चर्चेत आहे. बिग बॉस मराठी या टीव्ही शोमध्ये जणू ती रोजच राडा करताना दिसतेय. कधी ती वर्षा उजगांवर यांना मिळालेल्या पुरस्कारांची टिंगल करतेय तर कधी पंढरीनाथ कांबळे अर्थात पॅडी यांच्या अभिनयाची खिल्ली उडवतेय. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागामध्ये जान्हवीने पॅडींना जोकर म्हटलं. या घटनेनंतर आर्याने जेव्हा तिची चूक लक्षात आणून दिली. तेव्हा तिने तिचीही खिल्ली उडवली. तिचा हा रागीट स्वभाव प्रेक्षकांना आवडलेला नाही. तिचा हा आवेश पाहून प्रेक्षक प्रचंड चिढले आहेत. व तिला लवकरात लवकर घराबाहेर काढण्याची मागणी करत आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!