भारताचे ‘रॉकीभाई’ गौतम अदानी सुसाट..! बनले जगाचे तिसरे श्रीमंत व्यक्ती; ‘अशी’ वाढलीय कमाई!

WhatsApp Group

Gautam Adani Networth : अदानी समूहाचे (Adani Group) चेअरमन गौतम अदानी यांचं नाव संपूर्ण जगात गाजत आहे. ते आधीच भारतातील तसेच आशियातील सर्वात मोठे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. आता त्यांच्या संपत्तीत आणखी वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, उद्योगपती गौतम अदानी यांची प्रगती सुसाट होत असून ते आता जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अशी कामगिरी करणारे ते पहिले आशियाई उद्योगपती आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अदानी यांनी आता लुई व्हिटॉनचे सीईओ आणि अध्यक्ष बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकलं. निर्देशांकानुसार, अदानींची एकूण संपत्ती सध्या १३७ बिलियन डॉलर्स झाली आहे.

पहिल्या दोन स्थानी कोण?

आता अदानी समूहाच्या अध्यक्षपदी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हेच पुढे आहेत. ब्लूमबर्गच्या मते, मस्कची एकूण संपत्ती सध्या २५१ बिलियन डॉलर्स आहे, तर बेझोस यांची संपत्ती १५३ बिलियन डॉलर्स आहे. नेटवर्थ वाढवूनही अदानी मस्क यांच्या मागेच आहे. मस्क यांची एकूण संपत्ती अदानींपेक्षा ११४ बिलियन डॉलर्सनं अधिक आहे. मात्र, अदानी आणि बेझोस यांच्यात फारसा फरक नाही. बेझोस यांच्याकडं आता अदानींपेक्षा फक्त १६ बिलियन डॉलर्स जास्त आहेत.

हेही वाचा – मुकेश अंबानींची ‘मोठी’ घोषणा! या दिवाळीपासून भारतात सुरू होणार…

फोर्ब्सच्या यादीनुसार अदानी चौथ्या स्थानी

दुसरीकडं, फोर्ब्सच्या रिअलटाईम अब्जाधीशांच्या यादीवर नजर टाकली तर खूप वेगळं चित्र दिसतं. या यादीनुसार अदानी अजूनही चौथ्या स्थानावर आहेत. फोर्ब्सच्या यादीत मस्क २५५.१ बिलियन डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याच वेळी, बर्नार्ड अर्नॉल्ट अँड फॅमिली १६०.७ बिलियन डॉलर्ससह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. जेफ बेझोस १५४.३ बिलियन डॉलर्ससह तिसऱ्या स्थानावर आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार, गौतम अदानी आणि कुटुंबाची एकूण संपत्ती सध्या १४५.६ बिलियन डॉलर्स आहे. या यादीनुसार अदानी आणि कुटुंब बेझोस यांच्या मागे आहेत.

हेही वाचा – पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ सापडला!

‘अशी’ झालीय अदांनीच्या संपत्तीत वाढ!

ब्लूमबर्गच्या मते, ३० मार्च २०१४ रोजी गौतम अदानी यांच्याकडं केवळ ५.१० बिलियन डॉलर्स मालमत्ता होती. १६ जानेवारी २०२० रोजी ११ बिलियन डॉलर्सवर पोहोचलेल्या अदानींच्या संपत्तीत जून २०२० पासून वाढ सुरू झाली. ९ जून २०२१ पर्यंत त्यांची संपत्ती जवळपास सात पटीने वाढून ७६.७ बिलियन डॉलर्स झाली होती. २९ एप्रिल २०२२ रोजी त्यांनी १२२ बिलियन डॉलर्सचा टप्पा गाठला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment