Indian Railways : देशभरात पसरलेल्या रेल्वे नेटवर्कच्या मदतीने लाखो प्रवासी दररोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. ट्रेन हे प्रवासाचे स्वस्त साधन देखील मानले जाते आणि यामुळेच लोक बस किंवा इतर वाहनांऐवजी ट्रेनने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. पण, देशात एक असाही रेल्वे ट्रॅक आहे जिथे तुम्हाला खूप कमी अंतराचा प्रवास करण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. देशातील सर्वात लहान रेल्वे मार्गावर (Shortest Indian Rail Route) नागपूर ते अजनी हे अंतर फक्त 3 किलोमीटर आहे, पण जर तुम्ही भाड्याबद्दल बोलाल तर तुम्हाला इथे प्रवास करण्यासाठी 300 किलोमीटरच्या अंतराएवढे पैसे खर्च करावे लागतील.
ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग वेबसाईट Goibibo नुसार, नागपूर ते अजनी रेल्वे स्थानकादरम्यान स्लीपर क्लासमध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला 175 रुपये मोजावे लागतील. सामान्य तिकीट 60 रुपये आहे. त्याचप्रमाणे फर्स्ट एसीसाठी 1255 रुपये द्यावे लागतील. आता 3 किलोमीटरच्या प्रवासासाठी एसी क्लासमध्ये जागा कोण बुक करणार, हा विचार करण्यासारखा विषय आहे.
हेही वाचा – Car Coolant : उन्हाळ्यात कारमध्ये किती कूलंट घालावं? समजून घ्या नाहीतर…
जर तुम्ही दिल्ली ते जयपूर हा शालिमार एक्सप्रेसने फर्स्ट एसीमध्ये प्रवास केला तर तुम्हाला 1190 रुपये मोजावे लागतील. तर Goibibo च्या मते, जर तुम्ही विदर्भ एक्स्प्रेसने नागपूर ते अजनी असा केवळ 3 किमीचा प्रवास केला तर तुम्हाला 1255 रुपये खर्च करावे लागतील. त्याचप्रमाणे विदर्भ एक्स्प्रेसचे थर्ड एसी भाडे नागपूर ते अजनी 555 रुपये आणि सेकंड एसी साठी 760 रुपये असेल. स्लीपर क्लाससाठी 175 रुपये मोजावे लागतील.
त्याचप्रमाणे नागपूर-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये प्रवास केल्यास स्लीपर क्लाससाठी 175 रुपये, थर्ड एसीसाठी 555 रुपये आणि सेकंड एसीसाठी 760 रुपये मोजावे लागतील. महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपूर ते अजनी दरम्यान प्रवास केल्यास स्लीपरसाठी 145 रुपये, थर्ड एसीसाठी 505 रुपये आणि सेकंड 710 रुपये मोजावे लागतील.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!