India Monsoon 2023 : यंदा गेल्या 5 वर्षातील सर्वात कमी पाऊस! शेती करणं अवघड

WhatsApp Group

India Monsoon 2023 In Marathi : शेतकऱ्यांसाठी यंदा पावसाने यावेळी चिंता निर्माण केली आहे. या वर्षी आतापर्यंत जो पाऊस पडला आहे, तो केवळ कृषी क्षेत्रासाठी नाही तर बाजाराच्या दृष्टिकोनातूनही चांगला नाही. भारतात 2023 मध्ये झालेला मान्सूनचा पाऊस गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी आहे. पावसाची ही पातळी गेल्या 5 वर्षांतील सर्वात कमी आहे आणि त्यामागचे कारण म्हणजे ऋतूचक्र एल निनो. हवामान खात्याच्या (IMD) म्हणण्यानुसार, या कमी पावसामुळे ऑगस्ट हा शतकापेक्षा जास्त म्हणजे दहा वर्षांतील सर्वात कोरडा महिना ठरला आहे.

भारताच्या 3 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्‍यवस्‍थेसाठी मान्‍सून हंगाम अतिशय महत्‍त्‍वाचा आहे, कारण तो पिकांना सिंचन, जलाशय आणि जलसाठे भरण्‍यासाठी आवश्‍यक 70 टक्के पाऊस पुरवतो. इंडिया टुडेच्या अहवालात असे म्हटले आहे की सध्या भारतातील जवळपास निम्म्या शेतजमिनीमध्ये सिंचनाचा अभाव आहे, त्यामुळे कृषी उत्पादनासाठी मान्सूनच्या पावसाचे महत्त्व कमी लेखता येणार नाही.

हेही वाचा – Nanded : नांदेडच्या ‘त्या’ रुग्णालयात आणखी 7 रुग्णांचा मृत्यू, मृतांचा आकडा 31 वर

ही परिस्थिती पाहता यंदाच्या उन्हाळ्यात पावसाअभावी (Monsoon In India 2023) अन्नधान्य महागाई वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याचा अर्थ महागाई वाढू शकते. तज्ज्ञांच्या मते, कमी उत्पादनामुळे साखर, डाळी, तांदूळ आणि भाजीपाला यांसारखे मुख्य अन्नपदार्थ महाग होऊ शकतात.

अहवालानुसार, जून ते सप्टेंबरपर्यंत देशात दीर्घकालीन सरासरीच्या केवळ 94 टक्के पाऊस झाला आहे. हे 2018 नंतरचे सर्वात कमी आहे. एल निनोचा मर्यादित प्रभाव गृहीत धरून हवामान खात्याने सुरुवातीला या हंगामात 4 टक्के पाऊस कमी पडण्याचा अंदाज वर्तवला होता.

एल निनो ही पॅसिफिक पाण्याच्या तापमानवाढीद्वारे एक अशी घटना आहे, ज्यामुळे भारतीय उपखंडात सामान्यतः कोरडी परिस्थिती निर्माण होते. यंदा मान्सून (Rain In India 2023) असामान्य होता. त्याच्या उशिरा आगमनामुळे जूनमध्ये सरासरीपेक्षा 9 टक्के कमी पाऊस झाला. तथापि, जुलैमध्ये सरासरीपेक्षा 13 टक्के अधिक पावसासह सुधारणा झाली. ऑगस्टने सर्वात कोरडा महिना म्हणून विक्रम केला. याउलट, सप्टेंबरमध्ये परिस्थिती थोडी सुधारली आणि देशात सरासरीपेक्षा 13% जास्त पाऊस झाला.

मान्सूनची कमतरता असूनही, आयएमडीला ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत (Monsoon 2023) सामान्य पावसाची अपेक्षा आहे. तथापि, ऑक्टोबरमध्ये देशातील बहुतांश भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, यावरून एल निनोचा प्रभाव अद्याप संपलेला नसल्याचे दिसून येते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment