‘हर घर तिरंगा’ मोहिमेत भाग घ्यायचाय? घरबसल्या मिळेल सर्टिफिकेट; ‘असं’ करा डाऊनलोड!

WhatsApp Group

Har Ghar Tiranga Certificate : यावेळी भारत सरकारनं ७५व्या स्वातंत्र्यदिनी घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी (हर घर तिरंगा अभियान) वेगळा पुढाकार घेतला आहे. रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना १३ ते १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत देशभक्तीची भावना दर्शविण्यासाठी सोशल मीडियावर तिरंगा डीपी म्हणून लावण्याचं आणि तिरंग्यानं आपलं घर सजवण्याचं आवाहन केलं आहे. या मोहिमेचा भाग असलेल्या नागरिकांना तिरंगा फडकवल्याचे प्रमाणपत्रही मिळणार आहे. हे प्रमाणपत्र कसं डाऊनलोड करायचं, ते या लेखातून तुम्हाला कळेल.

नोंदणी कशी करावी?

  • हर घर तिरंगा मोहिमेसाठी harghartiranga.com या वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवर दिलेल्या पर्यायावर टॅप करा, ज्यामध्ये तिरंगा पिन करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
  • वेबसाइटसाठी लोकेशन सेवेला परवानगी द्या.
  • परवानगी मिळताच नोंदणी फॉर्म उघडेल. येथे तुमचे नाव आणि नंबर टाका.
  • तुमचं प्रोफाइल पिक्चर अपलोड करा.
  • पर्यायांवर टॅप करा.
  • तुम्ही तुमच्यानुसार लोकेशन अ‍ॅडजस्टही करू शकता.
  • नकाशामध्ये तिरंगा पिन केला जाईल आणि तो शोधला जाईल.

प्रमाणपत्र कसं डाऊनलोड करायचं?

तुम्ही harghartiranga.com पोर्टलवर भारतीय तिरंगा पिन करताच, सांस्कृतिक मंत्रालयाकडून तत्काळ प्रमाणपत्र जारी केले जाईल.

हेही वाचा – Har Ghar Tiranga Abhiyan : २० वर्षांपूर्वी घरांवर तिरंगा फडकवणं बेकायदेशीर होतं! वाचा आपल्या राष्ट्रध्वजाबाबत…

अमित शाह यांच्याकडून शुभारंभ

हे अभियान भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी सुरू केले होते. १३ ऑगस्ट २०२२ रोजी राष्ट्रध्वज फडकवण्यास सुरुवात होईल आणि १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत चालेल. केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारंही हर घर तिरंगा मोहिमेच्या प्रचारात सक्रियपणे गुंतलेली आहेत. या मोहिमेअंतर्गत सांस्कृतिक मंत्रालयानं हर घर तिरंगा थीम साँग लाँच केले आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, कपिल देव, विराट कोहली, अनुपम खेर आणि आशा भोसले यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा समावेश करण्यात आला आहे. सांस्कृतिक मंत्रालयानेही हे गाणे आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केले आहे.

हर घर तिरंगा मोहिमेचा उद्देश

राष्ट्रध्वजाशी देशवासीयांचे वैयक्तिक नातं प्रस्थापित करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. भारत सरकारच्या लक्षात आलं की देशवासियांचे राष्ट्रध्वजाशी अतिशय औपचारिक नातं आहे. देशभक्ती आणि भावनिक संबंध देशासाठी आवश्यक आहे. त्यामुळंच हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली.

हेही वाचा – घर विकलं, मुलीशी भेट टाळली आणि.., मोहम्मद अली जिन्नांचा भारतातील शेवटचा दिवस कसा गेला?

२० कोटी घरांचे उद्दिष्ट

पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं की, प्रत्येक देशवासीयाने या हर घर तिरंगा योजनेत सहभागी व्हावे आणि घरावर तिरंगा लावावा. यासाठी सरकारने २० कोटी घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये सरकारी कार्यालये आणि खासगी कार्यालयांचाही समावेश करण्यात येणार आहे.

Leave a comment