ITR Filing : ३१ जुलैनंतर भरल्यास दंड लागणार? वाचा काय आहे नवीन अपडेट!

WhatsApp Group

मुंबई : प्राप्तिकर विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २६ जुलैपर्यंत ३.४ कोटी लोकांनी आयकर रिटर्न (ITR) भरले आहेत. विभागाच्या वतीनं ITR भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ निश्चित करण्यात आली आहे. १५ जून २०२२ पासून सुरू झालेली ITR दाखल करण्याची प्रक्रिया आणखी दोन दिवस (३१ जुलैपर्यंत) सुरू राहणार आहे. तथापि, प्राप्तिकराच्या नियमानुसार, तुम्ही ३१ जुलैनंतर ITR भरला तरीही तुम्हाला दंड भरावा लागणार नाही. चला जाणून घेऊया काय आहे हा नियम?

ई-फायलिंगशी संबंधित वेबसाइटची गती मंदावली!

३१ जुलैपूर्वी आयटीआर फाइल करण्याचा प्रयत्न करणारे लोक, ई-फायलिंगशी संबंधित वेबसाइट मंदावली असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे आयकर विभाग आयकर भरणाऱ्यांना जागरूक करत आहेत. कोणत्याही प्रकारचा दंड टाळण्यासाठी वेळेवर आयटीआर दाखल करा, असं विभागाकडून सांगण्यात आलं. परंतु काही प्रकरणांमध्ये अंतिम तारखेनंतरही दंड न भरता आयटीआर दाखल केला जाऊ शकतो.

सूट मर्यादेपेक्षा कमी उत्पन्नावर दिलासा

आयकर तज्ञांचं म्हणणं आहे की आयकराच्या कलम 234F अंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीचं आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त नसेल, तर ITR उशीरा भरण्यात काही फरक नाही. सोप्या भाषेत, आर्थिक वर्ष २०२१-२२ पर्यंत तुमचे एकूण उत्पन्न असल्यास २.५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर तुम्हाला ३१ जुलैनंतर आयकर भरण्यासाठी कोणताही दंड भरावा लागणार नाही. तुमच्या वतीनं दाखल केलेल्या ITR ला शून्य (०) ITR म्हटलं जाईल.

हेही वाचा – अजबच..! गेल्या २२ वर्षांपासून ‘या’ माणसानं अंघोळच केलेली नाही; कारण ऐकाल तर…!

वय आणि वार्षिक उत्पन्न सूट

त्याचप्रमाणं, जर एखाद्यानं जुन्या कर प्रणालीची निवड केली, तर ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी आहे, त्यांना ही सूट २.५ लाख रुपये आहे. त्याच वेळी, ६० वर्षे किंवा त्याहून अधिक आणि ८० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांसाठी ३ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे. त्याचप्रमाणं, ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी मूळ सूट मर्यादा ५ लाख आहे.

अजूनही ‘इतक्या’ कोटी लोकांनी ITR भरलेला नाही!

आयकर विभागानं सांगितलं, की आतापर्यंत सुमारे ७ कोटी आयटीआर दाखल करायचे आहेत. अशा परिस्थितीत, जर शेवटच्या दिवसांत सुमारे ४.५ कोटी लोकांनी रिटर्न फाइल केले तर रिटर्न फाइलिंग पोर्टलवरील भार वाढू शकतो आणि सिस्टम मंद होऊ शकते. अशा समस्या टाळण्यासाठी, तुम्ही उशीर न करता तुमचे रिटर्न भरणं महत्त्वाचं आहे. रिटर्न भरण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट पाहू नये, असेही कर तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा – “मला काही झालं तर नाना पाटेकर…”, तनुश्री दत्तानं पुन्हा उडवून दिली खळबळ; पोस्ट व्हायरल!

दंड!

वेळेवर आयटीआर भरण्याचे अनेक फायदे आहेत. तुमचा इन्कम टॅक्स रिफंड झाला असेल, तर तुम्ही जितक्या लवकर इन्कम टॅक्स रिटर्न फाइल कराल तितक्या लवकर रिफंड तुमच्या खात्यात येईल. शिवाय, शेवटच्या तारखेला रिटर्न भरताना अनेकदा चुका होतात. तुमचा रिटर्न वेळेवर भरून तुम्ही हे टाळू शकता. अंतिम मुदतीनंतर ITR दाखल केल्यास दंड आकारला जाऊ शकतो. अंतिम मुदतीनंतर रिटर्न भरण्यासाठी, ५ लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्नावर १००० रुपये विलंब शुल्क आकारलं जाईल. ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नासाठी विलंब शुल्क ५००० रुपये असणार आहे आणि ही रक्कम १०,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते.

Leave a comment