

Ranbir Kapoor Beef Fan Video : बॉलिवूडमधील अनेक बिग बजेट चित्रपटांवर आजकाल सर्वजण बहिष्कार घालत आहेत. त्यात अक्षय कुमार, आमिर खान, शाहरुख खान या सुपरस्टारच्या चित्रपटांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या ‘ब्रह्मास्त्र’वरही नेटकऱ्यांनी बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. रणबीरनं “मला गोमांस खायला आवडतं” म्हटल्यानं ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू झाली आहे.
कुठला आहे हा व्हिडिओ?
रॉकस्टार चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीरचं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर म्हणतो, “मला गोमांस खायला आवडतं. म्हणूनच नेटिझन्स “आम्ही गोमांस खाणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन देत नाही”, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर बहिष्कार टाका, अशा प्रतिक्रिया देत आहेत. याआधी ऋषी कपूर यांनीही एक वादग्रस्त ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी गोमांस खास असल्याचं सांगितलं होतं. यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. आता रणबीरचा ‘मला गोमांस खायला आवडतं’ म्हणत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा – VIDEO : तुम्हाला माहितीये ‘ब्रम्हास्त्र’ बनवण्याची आयडिया दिग्दर्शकाला कशी सुचली?
Shiva of #Brahmastra in real life.#BoycottBrahmastra pic.twitter.com/JR1w6zzav7
— Kreately.in (@KreatelyMedia) August 28, 2022
कधी रिलीज होतोय ब्रह्मास्त्र?
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ ९ सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या मल्टीस्टाररमध्ये बॉलिवूड स्टार रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज नागार्जुन यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. अयान मुखर्जीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाचं रेकॉर्डिंग सुरू झालं आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील ‘केसरिया’ गाण्याच्या नावावर सर्वाधिक व्ह्यूजचा विक्रम आहे. हे गाणं अरिजित सिंगनं गायलं आहे. या गाण्याला प्रीतमनं संगीत दिलं आहे. तसंच या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत.
हेही वाचा – ….तेव्हा शाहरुख खानच्या प्रॉडक्शन कंपनीच्या गेटवरून संतोष जुवेकरला हाकलवण्यात आलं!
राजामौली म्हणाले…
बाहुबलीचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी ब्रह्मास्त्र पाहिला. ते म्हणाले, ”प्रेम हे सर्व शस्त्रांपेक्षा श्रेष्ठ आहे, हे ब्रह्मास्त्र चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. ब्रह्मास्त्र बद्दल मला सर्वात जास्त आवडलेली ही गोष्ट आहे. वानर अस्त्र, जल अस्त्र, अग्नी अस्त्र आणि ब्रह्मास्त्र यांसारख्या सर्वांमध्ये प्रेम सर्वात शक्तिशाली आहे हे अयाननं चित्रपटाद्वारे दाखवून दिलं आहे. अयाननं आपण यापूर्वी कधीही न पाहिलेलं जग निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं. आपल्या इतिहासातून, आपल्या पुराणांतून आपण शिकलेल्या शस्त्रास्त्रांचे अद्भुत जग. मी अयानच्या चित्रपटात एक दृष्टी पाहिली आहे आणि मला त्याचं समर्थन करायचं आहे.”