VIDEO : अचानक हृतिक रोशन मेट्रोत दिसला, प्रवाशांनी ओळखलं आणि…

WhatsApp Group

Hrithik Roshan In Mumbai Metro Marathi News : अभिनेता हृतिक रोशनने नुकताच मुंबई मेट्रोने प्रवास केला. हृतिकने याचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो त्याच्या चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसत होता. हृतिकच्या या व्हिडिओमध्ये तो मेट्रोच्या आत दिसत आहे. यावेळी तो कॅज्युअल लूकमध्ये दिसला.

मेट्रो प्रवासाबद्दल काय म्हणाला ह्रतिक? (Hrithik Roshan News In Marathi)

ही पोस्ट शेअर करताना हृतिकने कॅप्शनमध्ये लिहिले, ”आज कामावर जाण्यासाठी मेट्रो घेतली. काही खूप प्रेमळ आणि दयाळू लोक भेटले. त्याने मला दिलेले प्रेम मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. अनुभव विलक्षण होता. गरमी आणि ट्राफिकवर मात केली. मी ज्या अॅक्शन शूटसाठी जात आहे त्यासाठी माझी पाठ वाचवली.”

हेही वाचा – World Cup 2023 : मुशफिकुर रहीमची बत्ती गुल, असा झाला क्लीन बोल्ड! पाहा Video

फायटर या चित्रपटात दिसणार हृतिक (Hrithik Roshan In Metro)

हृतिक रोशन लवकरच सिद्धार्थ आनंदच्या ‘फाइटर’ चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी चित्रपटातील हृतिकचे मोशन पोस्टरही रिलीज केले होते. या अॅक्शन चित्रपटात दीपिका पदुकोण, अनिल कपूर हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होत आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment