मुंबई बंदरातील कंटेनरमधून १७२५ ​​कोटींची हेरॉईन जप्त..! दिल्ली पोलिसांची ‘मोठी’ कारवाई

WhatsApp Group

Heroin Seized From Nhava Sheva Port : महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील न्हावा शेवा बंदरातून हेरॉईनची सर्वात मोठी खेप जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी २२ टन वजनाचा कंटेनर जप्त केला असून त्यात हेरॉईन मोठ्या प्रमाणात आणले जात होते. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत १७२५ ​​कोटी रुपये आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं ही माहिती दिली आहे.

स्पेशल सेलचे विशेष आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी सांगितले की, हेरॉईनची ही खेप २१ जून २०२१ पासून मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरात उभ्या असलेल्या कंटेनरमध्ये होती. याबाबत कोणतीही एजन्सी कळली नाही. हा कंटेनर गेल्या शुक्रवारी म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी मुंबईतून जप्त करण्यात आला. त्यानंतर तो दिल्लीत आणण्यात आला.

हेही वाचा – Flipkart Big Billion Days Sale : काय काय घेऊ..! आज रात्री १२ पासून ‘मोठा’ सेल सुरू

पाकिस्तान-अफगाणिस्तान कनेक्शन

विशेष आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी दावा केला की, ही खेप भारतात पाठवणारी व्यक्ती पाकिस्तानमध्ये राहणारी आहे, पण ती मूळ अफगाणिस्तानची नागरिक आहे. या हेरॉईनमागे अफगाण कंपनीचा हात असून, त्यांनी ही खेप दुबईमार्गे पाठवली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अंमली पदार्थ भारताच्या विविध भागात पुरवले जाणार होते. ६ सप्टेंबर रोजी, स्पेशल सेलनं दिल्लीतून अटक केलेल्या दोन अफगाण नागरिकांच्या सांगण्यावरून चेन्नई बंदरातून भारतात आणलेले ३१२ किलो मेथॅम्फेटामाइन ड्रग्स देखील जप्त केले. आरोपी अफगाण नागरिक मुस्तफा आणि रहीमुल्ला यांनी पोलिसांना या मालाचा तपशीलही दिला होता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment