मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आमिर बॉलिवूडचे अवॉर्ड शो आणि फिल्म पार्ट्यांपासून दूर राहतो. तो सोशल मीडियाच्या गॅदरिंगपासून लांब दिसतो. आमिरला त्यांच्या लोकांसोबत राहण्याचा आनंद मिळतो. मात्र आमिरनं बॉलिवूड पार्ट्यांपासून स्वत:ला दूर का ठेवलं आहे?, याचा खुलासा कॉफी विथ करणमध्ये झाला आहे.
आमिर पार्ट्या का टाळतो?
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हटला जाणारा आमिर खान लाइमलाइटपासून दूर राहणंच पसंत करतो. बी-टाऊनमध्ये जिथे रोज पार्ट्या होतच असतात, पण आमिर कोणत्याही पार्टीत जॉईन होत नाही. करण जोहरनं आमिरला त्याच्या ५०व्या वाढदिवशी आमंत्रित केलं होतं आणि आमिरनंदेखील हजेरी लावली होती, परंतु कदाचित आमिरला त्याची पार्टी फारशी आवडली नाही. करण जोहरच्या शो कॉफी विथ करणच्या पाचव्या एपिसोडमध्ये आमिर खान आणि करीना कपूर आले होते. करीना कपूर म्हणाल, ”करण म्हणतो की, आमिर खूप कंटाळवाणा आहे. तसंच करणनं आमिरला ‘पार्टी पूपर’ म्हटलं होतं.” हे ऐकून आमिर खाननं उत्तर दिलं, ”पार्ट्यांमध्ये संगीत खूप जोरात वाजत असतं, जे मला आवडत नाही.”
हेही वाचा – २०० कोटीच्या ‘मन्नत’ बंगल्याचा मालक आज सलमान खान असता, पण…
करण म्हणाला, ”आमिर संगीतापासून दूर पळतो आणि पार्टीत एक-दोन लोकांना पकडतो आणि त्यांच्याशी गप्पा मारतो.” मात्र, जेव्हा करणनं आमिरला ‘पार्टी पूपर’ म्हटलं तेव्हा आमिरनं याला असहमती देत पार्ट्या का आवडत नाहीत हे सांगितलं. ”मी अजिबात कंटाळवाणा नाही आणि मी पार्टी पूपरही नाही. पार्ट्यांमध्ये इतकं जोरात संगीत असतं की, कोणालाच कोणाशी बोलता येत नाही”, असं आमिरनं स्पष्ट केलं.
रणवीरच्या न्यूड फोटो शूटवर आमिर म्हणतो…
करण जोहरनं आमिर खानला त्याच्या शोमध्ये रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया विचारली. प्रत्युत्तरात आमिरनं रणवीर सिंगचं कौतुक केलं. तो म्हणाला, ”होय, मी ते फोटो पाहिले आहेत. त्याची शरीरयष्टी खूप चांगली आहे. मला वाटतं रणवीरचं हे खूप धाडसी पाऊल होतं.” आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू आहे. या नकारात्मक वातावरणात आमिरनं लोकांना त्याचा चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे.
हेही वाचा – कमाईवाली शेती..! तुळशीचं उत्पन्न म्हणजे कमी गुतंवणूक जास्त नफा; वाचा सविस्तर!