Holi : “सर्वांच्या आयुष्यात आनंदाच्या क्षणांची…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सर्वांना होळीच्या शुभेच्छा!

WhatsApp Group

Holi : ‘होळीचा सण निसर्गाची ओढ निर्माण करणारा असतो. त्यातून पर्यावरणाविषयी जागरुकता वाढीस लागावी. या सणांच्या उत्साहातून आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदांच्या क्षणांची उधळण व्हावी, हे सण सामाजिक सलोखा, शांतता आणि सुव्यवस्था यांचे भान राखून साजरे करावेत. होळी पर्यावरणपूरक पद्धतीने आणि धूलिवंदन सण नैसर्गिक रंगांचा वापर करून साजरा करावा, असे आवाहन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, होळीचा हा पारंपरिक सण आपल्याला निसर्गाकडे घेऊन जातो. या सणातून पिढ्यान् पिढ्यांना पर्यावरणाचे जतन-संवर्धनाची शिकवण दिली जाते. यंदाही या सणातून आपल्यामध्ये जागरुकता वाढीस लागणारे उपक्रमांचे आयोजन व्हावे. धूलिवंदनाच्या रंगाची उधळण होते. हे रंग आपल्याला निसर्गाकडेच घेऊन जातात. या रंगाप्रमाणेच आपल्या सर्वांच्या आयुष्यात परस्पर स्नेह-प्रेमांच्या रंगांची बहार निर्माण व्हावी. या सणांच्या उत्सव-उत्साहातून सुख, समृद्धी आणि आनंदांच्या क्षणांची उधळण व्हावी, हीच मनोकामना.

हेही वाचा – Flipkart Sale : फ्लिपकार्ट सेलमध्ये बंपर ऑफर..! अर्ध्या किमतीत खरेदी करा AC, फ्रिज; जाणून घ्या!

फडणवीस यांच्याकडूनही शुभेच्छा

होळी आणि धुलिवंदनाचा सण निसर्गाशी आपले नाते सांगणारा, जीवनात विविध रंगांची उधळण करणारा सण आहे. सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाची उधळण व्हावी, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

तसेच पर्यावरणाचे रक्षण करत पर्यावरणपूरक पद्धतीने होळी आणि धुलिवंदन सण नैसर्गिक रंगांचा वापर करून साजरा करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केले आहे. हे सण सामाजिक सलोखा, शांतता आणि सुव्यवस्था यांचे भान राखून साजरे करण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, या सणांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाबाबत जागरुकता वाढीस लागणाऱ्या उपक्रमांचे आयोजन व्हावे. अनिष्ट रूढी व परंपरांचे निर्मूलन व्हावे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment