VIDEO : सांगलीत साधूंना बेदम मारहाण..! पोरामुळं ‘एक’ अफवा पसरली आणि लोकांनी काठ्याच काढल्या

WhatsApp Group

Sangli Sadhu Attack : महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात साधूंना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्वत:हून दखल घेत पोलिसांनी आयपीसी कलम ३२३,३२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ५ जणांची नावं समोर आली असून, १५ अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकारण सुरू झाले आहे. उद्धव ठाकरेंचा शिवसेना गट आणि भाजप एकमेकांवर निशाणा साधत आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये काही लोक साधूंना काठीनं मारहाण करताना दिसत आहेत. सांगलीच्या उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार म्हणाले, “साधूंनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. परंतु आम्ही १८ ते २० लोकांविरुद्ध स्वतःहून दखल घेऊन गुन्हा दाखल केला आहे, त्यापैकी सहा जणांची ओळख पटली आहे आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.”

हेही वाचा – किती भयानक आहे हे..! बोनेट उघडून ‘तो’ गाडी रिपेअर करत होता, इतक्यात…; पाहा VIDEO

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, हे चार साधू एका वाहनानं सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरला जात होते. “वाट चुकल्यानंतर त्यांना लवंगा गावाजवळील पॉवर स्टेशनजवळ एका मुलाशी भेट झाली,” असं अधिकाऱ्यानं सांगितलं. मुलाला कानडीशिवाय दुसरी भाषा येत नव्हती. साधुंचा चेहरा पाहून तो घाबरला आणि ‘चोर-चोर’ ओरडू लागला. यामुळे काही स्थानिकांना ते मुलांचं अपहरण करणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा भाग असल्याचा संशय आला.

गावातील लोक तेथे जमले आणि त्यांनी साधूंना पकडलं. दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली, जी वाढली आणि स्थानिक लोकांनी साधूंना काठ्यांनी मारहाण केली आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा असं आढळून आले की साधू हे उत्तर प्रदेशातील आहेत आणि गैरसमजातून ही घटना घडली आहे. साधुंनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला नाही आणि ते तिथून निघून गेले.

हेही वाचा – “जर त्यानं मला…”, CSK च्या खेळाडूचा महेंद्रसिंह धोनीवर खळबळजनक आरोप? वाचा!

काँग्रेसचा BJP ला सवाल!

या संपूर्ण घटनेवरून काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ”महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे संपुष्टात आली आहे. त्याचीच परिणती ही घटना आहे. पालघर घटनेला भाजपनं मोठा मुद्दा बनवला होता, मात्र आता ते काहीच बोलत नाहीत.” वास्तविक, एप्रिल २०२० मध्ये महाराष्ट्रातील पालघरमध्ये दोन साधूंसह तिघांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळीही जमावानं त्यांना चोर समजून बेदम मारहाण केली होती.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment