संजय राऊतांपाठोपाठ अनिल देशमुखांचीही दिवाळी तुरुंगात..! जामीन अर्ज फेटाळला

WhatsApp Group

Anil Deshmukh’s Bail Plea Rejected :महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना यावेळी तुरुंगातच दिवाळी साजरी करावी लागणार आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने १०० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी देशमुख न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआय ही या प्रकरणातील केंद्रीय तपास यंत्रणा आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ४ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाल्यानंतर देशमुख यांनी या प्रकरणात जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. देशमुखांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली. देशमुख हे महाराष्ट्राच्या पूर्वीच्या महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये मंत्री होते. या सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे भागीदार होते. देशमुख सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत. देशमुख यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले होते, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिल्यानंतर त्यांना पायउतार व्हावे लागले.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : शाब्बाश आयर्लंड..! जगज्जेता विंडीज संघ वर्ल्डकपबाहेर

राऊतांची दिवाळीही तुरुंगात

पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयाने धक्का दिला आहे. राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत २ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे दसऱ्यापाठोपाठ राऊतांची दिवाळीही तुरुंगातच जाणार आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment