Nitin Chandrakant Desai Commits Suicide : बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी पहाटे चारच्या सुमारास आत्महत्या केली. ५८ वर्षीय नितीन देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नितीन देसाई ९ऑगस्ट रोजी त्यांचा ५८ वा वाढदिवस साजरा करणार होते, मात्र खेदाची गोष्ट म्हणजे वाढदिवसापूर्वीच त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
मृत्यूचे कारण?
कर्जतचे आमदार महेश बालदी यांनी नितीन देसाई यांच्या निधनाची माहिती दिली आहे. नितीन देसाई यांनी आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले- नितीन देसाई माझ्या मतदारसंघात यायचे. अनेक दिवसांपासून ते आर्थिक संकटाशी झुंजत होते. आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी आज सकाळी एनडी स्टुडिओत आत्महत्या केली.
४ वेळा राष्ट्रीय पुरस्कार
नितीन देसाई यांना सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक म्हणून ४ वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. आपल्या दोन दशकांच्या कारकिर्दीत, नितीन देसाई यांनी बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले, ज्यात संजय लीला भन्साळी, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. चित्रपटसृष्टीत त्यांचे योगदान मोठे आहे.
हेही वाचा – Horoscope Today : कर्क आणि तूळसह ‘या’ ४ राशीचे लोक भाग्यशाली, वाचा आजचे दैनिक राशीभविष्य
नितीन देसाईचें चित्रपट
नितीन देसाईच्या चित्रपटांना कला दिग्दर्शक म्हणून खूप प्रसिद्धी मिळाली. १९८९ पासून ते या क्षेत्रात कार्यरत होते. ‘परिंदा’, ‘आ गले लग जा’, ‘अकेले हम अकेले तुम’, ‘विजेता’, ‘दिलजले’, ‘माचीस’, ‘लगान’, ‘इश्क’, ‘जंग’, ‘मिशन काश्मीर’, ‘वन 2’ ‘का 4’, ‘राजू चाचा’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘दोस्ताना’, ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’, ‘देवदास’, ‘द लिजेंड ऑफ भगतसिंग’, ‘पानिपत’ या चित्रपटात त्यांनी काम केले. हम दिल दे चुके सनम सारख्या सुपरहिट चित्रपटात त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून काम केले.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!