मुंबईत ना दिल्लीत, एलोन मस्कचा ‘हा’ मराठमोळा मित्र राहतो पुण्याच्या गल्लीत!

WhatsApp Group

Elon Musk meet Pranay Pathole : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांनी नुकतीच पुण्यातील २३ वर्षीय प्रणय पाथोळेची भेट घेतली. टेस्लाचे सीईओ प्रणयला अनेक दिवसांपासून आपला ट्विटर मित्र म्हणत आहेत. दोघांमधील त्यांची सोशल मीडिया मैत्री अनेकदा चर्चेचा विषय ठरते. दोघंही ट्विटरवर एकमेकांना प्रश्न विचारत असतात आणि उत्तरं देत असतात. प्रणयनं मायक्रोब्लॉगिंग साइटवर गिगाफॅक्टरी टेक्सास इथं मस्कसोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. भेटीनंतर मस्कसोबतचा एक फोटो अपलोड करताना प्रणयने लिहिलं, “Gigafactory Texas एलोन मस्कला भेटून खूप आनंद झाला. एवढा नम्र आणि जमिनीवर पाय असणारा माणूस कधीच पाहिला नाही. लाखो लोकांसाठी तू प्रेरणा आहेस.”

मैत्री कशी झाली?

मस्क आणि प्रणय २०१८ पासून सोशल मीडियावर मित्र आहेत. टेस्लाच्या ऑटोमॅटिक विंडस्क्रीन वायपर्सबद्दल प्रणयच्या ट्वीटवरून त्यांची मैत्री सुरू झाली. काही वर्षांपूर्वी प्रणयनं मस्कला उद्देशून ट्वीट केलं होतं. हे टेस्ला कारच्या वैशिष्ट्याबद्दल लिहिलं होतं. या ट्विटला काही वेळातच मस्क यांनी प्रणयला उत्तर दिलं. त्यांनी लिहिले “पुढील प्रकाशनात निश्चित,” तेव्हापासून मस्क आणि प्रणय नियमित संभाषणात आहेत. ते ट्विटरवर एकमेकांना उत्तर देत असतात.

हेही वाचा – भारताचे गौतम अदानी ठरले जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती; बिल गेट्स यांना टाकलं मागे!

कोण आहे प्रणय?

पुणेस्थित प्रणयचे ट्विटरवर एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. प्रणयनं मंगळ ग्रहाबद्दल ट्वीट केले होते, ज्याला मस्क यांनी उत्तर दिले. या पिन ट्विटला २८ हजार रिट्विट्स आणि १३८ हजार पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. प्रणय सध्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) साठी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत आहे.

हेही वाचा – रतन टाटांचं २५ वर्षांच्या ‘दोस्ता’सोबत नवं स्टार्टअप! वाचाल तर तुम्हीही सलाम ठोकाल!

मस्क नेहमीच चर्चेत

टेस्लाचे सीईओ मस्क अनेकदा चर्चेत असतात. मस्क, मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मसह कायदेशीर लढाईत अडकले, त्यांनी एक दिवस आधी ट्विटर विकत घेण्यास नकार दिल्यानंतर आता त्यांनी त्याचा मित्र जॅक डोर्सी यांच्याकडं मदत मागितली आहे. डोर्सी हे ट्विटरचे माजी सीईओ आणि सह-संस्थापक आहेत. एलोन मस्क यांनी जॅक डोर्सीला न्यायालयात साक्ष देण्यासाठी समन्स बजावले आहे. कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, मस्क यांवी ट्विटर डीलमधून माघार घेतल्यानंतर सुरू झालेल्या कायदेशीर कारवाईच्या संदर्भात हे समन्स पाठवण्यात आले आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment