दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रातील लोकांना लागणार शॉक, वीज दरवाढ होणार!

WhatsApp Group

Maharashtra Electricity Price Increase : दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसू शकतो. राज्यात वीज आणखी महाग होण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीने गुरुवारी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाशी दरवाढीबाबत चर्चा केली. अशा स्थितीत आता भविष्यात विजेचे दर पुन्हा वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम वीज बिलावर होणार आहे.

आयोगाने महावितरणला वीज दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे. कोविड काळात लॉकडाऊन आणि संसर्गामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाल्याची माहिती महाविद्राने दिली आहे. यासोबतच महावितरणची थकबाकीही या काळात वाढली. मात्र कंपनी सावरलेली नाही. कोविड काळात एकूण ७० हजार कोटी रुपये थकीत होते. आजही ते कमी झाले नसल्याचे महावितरण कंपनीचे म्हणणे आहे. महावितरण महागडी वीज खरेदीचे कारण देत आहे, मात्र कंपनी नागरिकांकडून आधीच इंधन समायोजन शुल्क आकारत आहे. मात्र, थकबाकी वसूल करण्यात अपयशाचा फटका ग्राहकांना सोसावा लागणार आहे.

हेही वाचा – Andheri East Bypoll Election : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी सेना-भाजप वगळता ‘या’ तिघांनी भरलेत अर्ज!

कृषी क्षेत्रातून महावितरणला तब्बल ४५ हजार ७०० कोटी येणे बाकी आहे. पथदिवे ६ हजार ५०० कोटी, पाणीपुरवठा १८०० कोटी आणि घरगुती विज वापरकर्त्यांकडून १९०० कोटी थकीत आहे. औद्योगिक क्षेत्रातून ७५० कोटी हे अजूनही येणे बाकी आहे.

Leave a comment