ED Action On Raj Kundra Shilpa Shetty : बिटकॉइन पॉन्झी घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची 97.79 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तेत शिल्पाच्या नावावर असलेल्या जुहू येथील फ्लॅटचाही समावेश आहे. ईडीने ही कारवाई मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) कायदा 2002 अंतर्गत केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत जुहू येथील फ्लॅट, पुण्यातील एक बंगला आणि राज कुंद्राच्या नावे अनेक इक्विटी शेअर्सचाही समावेश आहे. महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला होता.
ही एफआयआर मेसर्स व्हेरिएबल टेक प्रा. लि., अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि काही एजंटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की या लोकांनी खोट्या आश्वासनांच्या आधारे 2017 मध्ये गुंतवणूकदारांकडून सुमारे 6600 कोटी रुपयांचे बिटकॉइन मिळवले होते. यावेळी लोकांना 10 टक्के परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले. ही एक प्रकारची पॉन्झी स्कीम होती. गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली.
हेही वाचा – चेन्नई सुपर किंग्जला हादरा! ‘स्टार’ ओपनर संपूर्ण आयपीएल बाहेर; नव्या खेळाडूला घेतलं!
या घोटाळ्याचा सूत्रधार अमित भारद्वाजकडून राज कुंद्राला 285 बिटकॉइन्स मिळाल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. ही बिटकॉइन्स युक्रेनमधील बिटकॉइन खाणकामात गुंतवणुकीसाठी प्राप्त झाली होती. पण असे कधीच घडले नाही आणि हे बिटकॉइन्स अजूनही कुंद्राकडे आहेत. ज्याची सध्याची किंमत 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
2021 मध्ये राज कुंद्रा यांचे नाव पॉर्नोग्राफी प्रकरणातही आले होते. याप्रकरणी त्याला अटकही झाली होती. त्याला 19 जुलै 2021 रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्यावर हॉटशॉट्स नावाच्या ॲपद्वारे ॲडल्ट फिल्म्स बनवून त्याचे वितरण केल्याचा आरोप होता. तो 63 दिवस तुरुंगात राहिला पण नंतर त्याला जामीन मिळाला.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा