Praful Patel On Sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. पटेल रविवारी राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते, जिथे अजित पवार आणि इतर आठ राष्ट्रवादी नेते महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाले.
दुसऱ्या दिवशी सत्तावाटपाच्या बैठकीसाठी पटेल अजित पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना पटेल म्हणाले, “आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आहोत आणि त्यामुळेच आम्ही हे करत आहोत.” मंत्रीपद मिळू शकेल का? त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, ”आम्ही दिल्लीबाबत काहीही चर्चा केलेली नाही, आम्ही फक्त महाराष्ट्रात आमचे सरकार स्थापनेबाबत चर्चा केली आहे.”
#WATCH | NCP leader Praful Patel, says "We are the NCP and that is what we are doing. We will decide now if I have to go to Delhi. We have not discussed anything about Delhi, we have only discussed about the formation of our government in Maharashtra" pic.twitter.com/Wp4e3X7RIi
— ANI (@ANI) July 3, 2023
तेव्हा त्यांना विचारण्यात आले की त्यांनी पक्षाचा आणि शरद पवारांचा विश्वासघात केला आहे का?’ यावर पटेल यांनी रागाच्या भरात कारची खिडकी खाली केली आणि त्यांची कार वेगाने निघून गेली. याचा एक व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.
हेही वाचा – SSC Recruitment 2023 : 10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी! ‘असा’ भरा अर्ज
रविवारच्या शपथविधी सोहळ्याला प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीने अजित पवारांच्या बंडाला मोठा पाठिंबा असल्याचे सूचित केले. एकनाश शिंदे सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याबरोबरच राष्ट्रवादीच्या इतर 8 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे पक्ष एक आहे आणि शरद पवार त्याचे नेते आहेत, असे पटेल यांनी रविवारी रात्री एनडीटीव्हीला सांगितले. ते म्हणाले होते, ”आम्ही पक्ष आहोत आणि शरद पवार आमचे नेते आहेत. कोणीही पक्ष सोडलेला नाही किंवा पक्षापासून फारकत घेतलेली नाही. काही वेळा पक्षांतर्गत मतभेद होतात आणि ते मिटवले जातात. तुम्ही अजून काही दिवस थांबा, मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला दिसेल.”
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!