‘बिझनेस माइंडेड’ अभिनेते प्रदीप पटवर्धन आपल्याच नाटकाची तिकिटं ब्लॅकनं विकायचे?

WhatsApp Group

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला चटका लावून देणारी बातमी समोर आली आहे. ‘नवरा माझा नवसाचा’चा चित्रपटात सगळ्यांना लक्षात राहिलेल्या बाबु कालिया ही व्यक्तिरेखा साकारलेले ५२ वर्षीय प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचं निधन झालं आहे. लोकप्रिय मराठी आणि विनोदी अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. आज मंगळवारी त्यांनी (९ ऑगस्ट) अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्यानं मराठी जगताला धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाव्यतिरिक्त प्रदीप पटवर्धन यांनी अनेक लक्षात राहतील असे चित्रपट आणि नाटकं केली. ‘मोरूची मावशी’ या नाटकातील त्यांचं काम आजही चर्चेचा विषय ठरतं. पटवर्धन यांनी भरत जाधव, विजय चव्हाण, विजय पाटकर यांच्यासोबत आपली ओळख निर्माण केली. पटवर्धन हे गिरगावात राहत होते. कॉलेज काळापासूनच त्यांनी एकांकिका स्पर्धा गाजवल्या. त्यांचं विनोदाचं टायमिंग अफलातून होतं. काही काळानंतर ते व्यावसायिक नाटकाकडं वळले. मोरुची मावशी या नाटकानं त्यांना सर्वदूर पसरवलं होतं.

पटवर्धन यांचे चित्रपट!

एक दोन तीन चार, लावू का लाथ, चश्मेबहाद्दर, भुताळलेला, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं, एक शोध हे प्रदीप पटवर्धन यांचे लक्षात राहतील असे चित्रपट आहेत. होल्डिंग बॅक, मेनका उर्वशी, आणि थँक यू विठ्ठला, एक दोन तीन चार आणि पोलीस लाईन एक पूर्ण सत्य यासारख्या चित्रपटांची निर्मितीही पटवर्धन यांनी केली.

ब्लॅकच्या तिकिटांचा किस्सा!

मकरंद अनासपूरे होस्ट करत असलेल्या ‘इरसाल पाहुणे’ या कार्यक्रमात विजय पाटकर, प्रदीप पटर्वधन आले होते. तेव्हा पाटकरांनी पटवर्धन यांची टर उडवत काही खुलासे केले. हे खुलासे अर्थात पटवर्धन यांनी नाकारले. ”मोरूची मावशी हे नाटक तुफान गाजत असताना पटवर्धन हा नाटकाची तिकिटं ब्लॅकनं विकायचा, तो पक्का बिझनेस माइंडेड आहे. सुधीर भटांकडून जी तिकीटं मिळतील ती तो घ्यायचा आणि ब्लॅक करायचा. कोण असं करतं आणि कोणाला हे सुचतं. नाटकाची नाईट आणि वर हे वरचे पैसे. कोणता अभिनेता तिकिट घेईल आणि ब्लॅक करेल”, असं पाटकरांनी पटवर्धन यांच्यासमोच सांगितलं होतं.

हेही वाचा – घर विकलं, मुलीशी भेट टाळली आणि.., मोहम्मद अली जिन्नांचा भारतातील शेवटचा दिवस कसा गेला?

पटवर्धनांनी यावर उत्तर देत म्हटलं होतं, ”अरे मी कशाला तिकिटं ब्लॅक करेन, मला चांगली नोकरी आहे, मला तिकिटं ब्लॅक करायची गरज काय?” हा किस्सा झाल्यानंतर दोघेही एकमेकांची टर उडवताना दिसून आले होते.

Leave a comment