दीपिका पादुकोणची तब्येत बिघडली..! ब्रीच कँडी रुग्णालयात करण्यात आल्या चाचण्या

WhatsApp Group

Deepika Padukone Hospitalised : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला सोमवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये तिच्या अनेक चाचण्याही करण्यात आल्या, ज्यामध्ये जवळपास अर्धा दिवस गेला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. असे असले तरी दीपिका किंवा तिच्या टीमकडून याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, दीपिकाने प्रकृती अस्वस्थतेची तक्रार केली होती. तिला खूप त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागला आणि तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दीपिकाला आता बरे वाटत आहे. काही महिन्यांपूर्वी दीपिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयाचे ठोके वाढल्यानंतर दीपिकाला अस्वस्थतेमुळे रुग्णालयात नेण्यात आले होते. यादरम्यान ती साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत शूटिंग करत होती. तिला आरोग्य तपासणीसाठी अर्धा दिवस कामिनेनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा – लेजेंडरी अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार!

मात्र, उपचारानंतर लगेचच दीपिका अमिताभ बच्चन यांच्यासोबत शूट करण्यासाठी सेटवर परतली. ‘प्रोजेक्ट के’ हा दीपिकाचा प्रभाससोबतचा पहिला चित्रपट आहे. यात अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, गुरुपौर्णिमेच्या दिवशी, अमिताभ बच्चन यांनी प्रभास-स्टारर चित्रपटासाठी सुरुवातीचे शॉट्स दिले.

Leave a comment