Death Threats Mukesh Ambani and Family : दसऱ्याच्या दिवशी एका अज्ञात व्यक्तीने दक्षिण मुंबईतील सर एचएन रिलायन्स रुग्णालयाच्या लँडलाइन क्रमांकावर फोन करून धमकी दिली आहे. या व्यक्तीने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी दिली. याशिवाय मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना संपवण्याची बाबही समोर आली आहे. या धमकीनंतर रुग्णालय आणि अंबानी कुटुंबाचे घर अँटिलियाच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत अंबानी कुटुंबाला धमक्या येण्याची ही दुसरी वेळ आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला, ज्यामध्ये धमकी देण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी सांगितले की, कॉल करणाऱ्याने अंबानी कुटुंबातील काही लोकांचे नाव घेऊन धमकावले. याप्रकरणी डीबी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हा फोन कॉल ट्रेस करण्यात आला आहे.
हेही वाचा – Flipkart च्या सेलमुळं लोक हैराण..! कंपनीवर काढतायत राग; म्हणाले, “हा तर स्कॅम आहे”
Mumbai: Bussinessman Mukesh Ambani, family get death threats https://t.co/Hm0VAnLEty
— Richa Pinto (@richapintoi) October 5, 2022
या वर्षी ऑगस्टमध्येच एका ५६ वर्षीय ज्वेलर्सला अटक करण्यात आली होती. मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांना धमकावल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. तसेच मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. विष्णू विधू भौमिक असे आरोपीचे नाव आहे. त्याने ९ वेळा हॉस्पिटलमध्ये फोन करण्याची धमकी दिली होती. एका कॉलमध्ये त्याने आपले नाव अफजल गुरू असल्याचे सांगितले होते.