

Cyclone Biporjoy : बायपरजॉय चक्रीवादळ आक्रमक झाले आहे. मुंबईपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत समुद्रात वादळी लाटा उसळत आहेत. IMD ने गुजरातमध्ये अलर्ट जारी केला आहे. गुजरातशिवाय इतर राज्यांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, लक्षद्वीप इत्यादींसह अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी हवामान चेतावणी जारी केली आहे. गुजरातमधील मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 16 जूनपर्यंत बंदरे बंद ठेवण्यात आली आहेत.
या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार
जवळ येत असलेल्या चक्रीवादळामुळे, प्रदेशात अत्यंत मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यासह हवामान खराब झाले आहे. हवामान खात्यानुसार, चक्रीवादळ बायपरजॉयच्या प्रभावामुळे 15 जून रोजी राजस्थानच्या जोधपूर आणि उदयपूरमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, 16 जून रोजी नैऋत्य राजस्थानमध्ये 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. जोधपूर, उदयपूर आणि अजमेर आणि लगतच्या भागात 17 जूनपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, बायपरजॉय गुरुवारी, 15 जून रोजी दुपारी कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ बंदराजवळ पोहोचेल. ज्याचा कमाल वेग म्हणजेच वाऱ्याचा वेग ताशी 150 किलोमीटर असेल. किनारपट्टीवर आदळल्यानंतर त्याचा वेग कमी होईल. हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, चक्रीवादळ बायपरजॉय 13 जून रोजी रात्री 11:30 वाजता ईशान्य अरबी समुद्रावर देवभूमी द्वारकेच्या 300 किमी WSW अक्षांश 21.7N आणि रेखांश 66.3E जवळ स्थित आहे. दुसरीकडे, ट्रॅकरच्या ताज्या अपडेटनुसार, चक्रीवादळ बायपरजॉय सध्या ताशी 165 किमी वेगाने गुजरात किनारपट्टीकडे सरकत आहे.
हेही वाचा – नवीन Honda Dio 2023 भारतात लाँच, सोबत मिळते स्मार्ट चावी!
बायपरजॉय चक्रीवादळाच्या तीव्रतेमुळे मुंबईत उंच लाटा उसळत आहेत. बायपरजॉय चक्रीवादळ अधिक धोकादायक बनत असल्याने गुजरातमधील किनारी भागातील रहिवाशांना निवारा गृहात हलवण्यात आले. बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरात किनारपट्टी ओलांडणार असल्याने कच्छमध्ये चार, द्वारका आणि राजकोटमध्ये प्रत्येकी तीन, जामनगरमध्ये दोन आणि पोरबंदरमध्ये एक अशा एकूण 17 NDRF (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) टीम तैनात करण्यात आल्या आहेत. गुजरातमधील कच्छ, पोरबंदर, अमरेली, गिर सोमनाथ आणि द्वारका जिल्ह्यातील शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!