Congress leader Dies During Bharat Jodo Yatra : ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होत असताना मंगळवारी काँग्रेस सेवादलाचे नेते कृष्णकांत पांडे यांचे निधन झाले. काँग्रेसची भारत जोडी यात्रा सध्या महाराष्ट्रातून जात आहे. काल रात्री ही यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. पांडे हे काँग्रेसच्या सेवादलाचे सरचिटणीस होते.
काँग्रेसने एका निवेदनात म्हटले आहे की मोर्चादरम्यान पांडे कोसळले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, पांडे स्वत: आणि पक्षाचे दिग्गज दिग्विजय सिंह यांच्यासह तिरंगा हातात घेऊन मागे फिरले होते आणि त्यानंतरच ते पडले. त्यांना अॅम्ब्युलन्समध्ये रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
Shri @RahulGandhi ji, Shri @LaljiDesaiG ji and #BharatJodoYatra family pay tributes to the departed soul of Shri krishnakant Pandey ji (General Security Seva Dal) pic.twitter.com/wDQqNCZmu8
— Nuh Congress Sevadal (@SevadalNUH) November 8, 2022
हेही वाचा – Viral Video : चहापासून बनवलं आईस्क्रीम..! तुम्हाला कशी वाटली आयडिया? पाहा
कांग्रेस सेवा दल के महासचिव, कृष्णकांत पांडे जी का निधन पूरे कांग्रेस परिवार के लिए बहुत दुःखद है। उनके प्रियजनों को मैं अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं।
आज, यात्रा के दौरान अंतिम समय में उन्होंने हाथों में तिरंगा थामा था। देश के लिए उनका समर्पण हमें सदा प्रेरणा देता रहेगा। pic.twitter.com/VvC1O5ZJfh
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 8, 2022
राहुल गांधींचं ट्वीट!
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पांडे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट केले, “काँग्रेस सेवादलाचे सरचिटणीस कृष्णकांत पांडेजी यांचे निधन संपूर्ण काँग्रेस परिवारासाठी दु:खद घटना आहे. त्यांच्या प्रियजनांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. आज प्रवासादरम्यान शेवटच्या क्षणी त्यांनी तिरंगा हातात घेतला. त्यांचे देशाप्रती असलेले समर्पण आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील.”