CM Eknath Shinde Stops Convoy On Mumbai Highway : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या कामांमुळे दररोज चर्चेत असतात. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मंगळवारी पहाटे एका आलिशान कारला आग लागली. त्याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा जात होता. शिंदे यांना कारला आग लागल्याच समजताच त्यांनी आपली गाडी तिथंच थांबवली आणि त्या गाडीच्या मालकाकडं धाव घेतली.
वृत्तसंस्था पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन अधिकाऱ्यानं सांगितलं, की महामार्गावरील विलेपार्ले परिसरात झालेल्या या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. हा मुंबईतील उत्तर-दक्षिण मुख्य रस्ता आहे. अग्निशमन विभागाला दुपारी १२.२५ वाजता याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पाठवून आग आटोक्यात आणल्याचे त्यांनी सांगितलं.
हेही वाचा – Asia Cup 2022 : श्रीलंकेनं कानाखाली ठेऊन दिली..! सुनील गावसकरांची विजेतेपदानंतर प्रतिक्रिया
मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा रस्त्याच्या विरुद्ध बाजूनं जात असल्याची माहिती आहे. ही घटना पाहता मुख्यमंत्र्यांनी त्यांचा ताफा थांबवला आणि प्रवाशाच्या मदतीसाठी पोहोचले. सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला असून त्यात मुख्यमंत्री शिंदे कार चालकाशी बोलताना दिसत आहेत. संवादादरम्यान मुख्यमंत्र्यांनी चालकाचं नाव विचारलं, ज्याने स्वत:ची ओळख विक्रांत शिंदे अशी दिली. जीवन महत्त्वाचं असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी त्या तरुणाला गाडीजवळ न जाण्यास सांगितलं आणि निघण्यापूर्वी मदतीचं आश्वासन दिलं.
काय संवाद झाला?
मुख्यमंत्र्यांनी त्या रडत असलेल्या तरुणाला नाव विचारलं. तेव्हा त्या तरुणानं विक्रांत शिंदे असं नाव सांगितलं. त्यानंतर कोणीतरी हा तरुण कराडचाच आहे असं म्हटलं. त्यानंतर शिंदे म्हणाले, जीवापेक्षा दुसरं काही नाही. जीव वाचला ते महत्त्वाचं आहे. काळजी करू नकोस. गाडी आपण नवीन घेऊ. त्या आगीजवळ आणि गाडीजवळ जाऊ नकोस बाळा.” दरम्यान ही आग कशी लागली, गाडी कुठली होती, यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही.
रात्रीचे १२.३०.. पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले येथे एका तरुणाच्या गाडीला अचानक आग लागली. औरंगाबादहून मुंबईला येताना विमानतळावरून घरी जाताना भर पावसात खाली उतरुन मा.@CMOMaharashtra साहेबांनी संबंधित यंत्रणेला
त्या तरुणाला मदत करण्याचे आदेश दिले. हे आहेत आपले मुख्यमंत्री. pic.twitter.com/6ipRQwrXCo— sheetal mhatre (@sheetalmhatre1) September 12, 2022
हेही वाचा – संतापजनक! नवी मुंबईतील डेंटल कॉलेजमध्ये रॅगिंग; ज्युनियरला दारु पाजली आणि पँटमध्ये…
हा व्हिडिओ शिंदे गटाच्या समर्थक शितल म्हात्रे यांनी शेअर केला आहे. “रात्रीचे १२.३० वाजले होते. पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले येथे एका तरुणाच्या गाडीला अचानक आग लागली. औरंगाबादहून मुंबईला येताना विमानतळावरून घरी जाताना भर पावसात खाली उतरुन मुख्यमंत्री शिंदेंनी संबंधित यंत्रणेला त्या तरुणाला मदत करण्याचे आदेश दिले. हे आहेत आपले मुख्यमंत्री,” असं म्हात्रे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हणाल्या.