CM Eknath Shinde On Measles In Mumbai : मुंबई महानगरातील गोवरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर देऊन रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बालकांची विशेष काळजी घ्यावी. गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे. लसीकरणाविषयी जाणीवजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील गोवर साथ नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेतली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते. मुंबई महापालिका आयुक्त डॉ. आय. एस. चहल यांनी यावेळी मुंबईतील गोवर आजाराच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
हेही वाचा – AUS Vs ENG : फिल्डिंग असावी तर अशी..! हवेत डाय टाकत वाचवला SIX; पाहा Video
मुंबईमध्ये गोवर या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढू लागल्याने आज @mybmc च्या कस्तुरबा रुग्णालयातील बालरुग्ण कक्षाला भेट देऊन सुरू करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.कस्तुरबा रुग्णालयात सध्या गोवर या आजारावर उपचार घेणाऱ्या बालकांवर सुरू असलेल्या उपचारांची महिती घेतली. pic.twitter.com/V7IjZWgYJY
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 17, 2022
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, लसीकरणाच्या अभावी बालकांना गोवरचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ज्या भागात गोवरचा प्रादुर्भाव जास्त आहे तेथे तातडीने लसीकरणाची मोहीम मुंबई महापालिकेने हाती घ्यावी. लसीकरणाविषयी जाणीवजागृती करण्यासाठी स्थानिक नेते, विविध धर्मगुरू यांची मदत घ्यावी. गोवरची साथ नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ज्या बालकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
मुंबईत १६४ बालकांना गोवरची लागण झाली असून त्यातील ६१ रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लसीकरणासाठी ९०० हून अधिक केंद्र सुरू करण्यात आले असून लसीकरणाच्या समन्वयासाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत तसेच बालकांना ‘अ’ जीवनसत्वाची मात्रा (डोस) देण्यात येत असल्याचे आयुक्त डॉ. चहल यांनी सांगितले.