

CM Eknath Shinde On CIDCO Housing Diwali Scheme 2022 : राज्याचे मुख्यमंत्री यांनी आज दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. मुंबईत आता घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आज सिडको कडून घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. सिडकोने ७८४९ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. सर्वसामान्यांसाठी दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे. ही घोषणा करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेनी एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
नवी मुंबईतील उलवे नोडमधील बामणडोंगरी व खारकोपर या भागात ही घर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शिंदेंनी केले आहे. शिंदेनी सांगितलेस की हा प्रकल्प ‘परिवहन केंद्रित विकास’ या संकल्पनेवर आधारित आहे. २५ ऑक्टोबर पासून या प्रकल्पासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तर १९ जानेवारी २०२३ दिवशी या घरांसाठीचा निकाल जाहीर करण्यात येईल. यासाठी लोकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
हेही वाचा – Diwali 2022 : “जय लक्ष्मी माता…”, अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं ऐकलं का? पाहा Video
दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘सिडको’ च्या नवीन महागृहनिर्माण योजनेची घोषणा.
नवी मुंबईतील उलवे नोडमधील बामणडोंगरी व खारकोपर येथे परवडणाऱ्या दरात ७ हजार ८४९ सदनिका होणार उपलब्ध. या सोडतीचा लाभ घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन pic.twitter.com/mP3XHScq0R— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 24, 2022
नवी मुंबई क्षेत्रात सिडकोने आजपर्यंत सुमारे दीड लाखांहून अधिक घरे बांधली आहेत. सिडकोकडून विविध उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्यात येतात. महागृहनिर्माण योजनेतील सर्व प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी, शुल्क भरणा इ. करीता https://lottery.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.