CM Eknath Shinde On Balasaheb Thackeray National Memorial : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणीआज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे स्मारक जनतेला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करतानाच त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी दिली. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दादर येथील महापौर बंगला परिसरात सुरू असलेल्या स्मारकाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. यावेळी त्यांनी आढावा बैठकही घेतली. बैठकीस मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहूल शेवाळे, आमदार दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, माजी मंत्री रामदास कदम, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर श्रीनिवास उपस्थित होते.
वंदनीय #हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला दादर येथील स्मृतिस्थळावर उपस्थित राहून स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होऊन विनम्रतापूर्वक अभिवादन केले. pic.twitter.com/URLQdfaGzf
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 16, 2022
हेही वाचा – राजकीय नेत्यानं घरात ठेवले बॉम्ब, बॉल समजून खेळू लागली मुलं, स्फोट झाला अन्…!
साहेब आपले विचार आणि स्मृती सदैव आमच्या मनात…
वंदनीय #हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख स्वर्गीय #बाळासाहेब_ठाकरे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन…#BalasahebThackeray pic.twitter.com/FjuqsaWSqf
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 17, 2022
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ”या स्मारकाच्या कामाची पाहणी केली. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाले असून मार्च २०२३ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्यात येईल. बाळासाहेबांच्या स्मारकातून जनतेला प्रेरणा मिळणार असून त्यासाठी त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. स्मारकाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यात येणार आहे.”
बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक जनतेचे असून ते लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला हे स्मारक समर्पीत करण्याचा मानस असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या महापौर निवासस्थानाचे वारसा संर्वधन व जतन करणे, प्रवेशद्वार इमारतीचे बांधकाम, इंटरप्रिटेशन सेंटरचे बांधकाम, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम इ. कामे प्रगतीपथावर आहेत. या स्मारकाच्या पहील्या टप्प्यातील ५८.३५ टक्के काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामांना नुकतीच सुरुवात झाली आहे, असे श्रीनिवास यांनी सादरीकरणादरम्यान सांगितले.