मोठ्या शहरात घराचे भाडे आरामात 15 हजाराच्या पुढे जाते. दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि चेन्नई या शहरात महिन्याला 25-30 हजार रुपये घरभाडे द्यावे लागते. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मुंबईत एका ठिकाणी 2 बीएचके फ्लॅटचे भाडे (Cheapest 2BHK House Rent In Mumbai) केवळ 4300 रुपये आहे. फेक न्यूज वैगेरे वाटत असेल, तर न्यूज 18 हिंदी, मनी कंट्रोल यांनीही याबाबत वृत्त दिले आहे.
या वृत्तात मुंबईतील या सर्वात स्वस्त भाड्याच्या अपार्टमेंटचा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे हा फ्लॅट मुंबईच्या मध्यभागी अत्यंत पॉश भागात आहे. मुंबईत भाड्याने राहत असल्याचे ऐकून सामान्यपणे घाम फुटतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला 2 बीएचके फ्लॅट महिन्याला फक्त 4300 रुपयांमध्ये मिळाला तर तुम्ही काय म्हणाल?
मुंबईत हा फ्लॅट कुठे आहे?
मुंबईतील सर्वात कमी भाड्याचा हा 2 BHK फ्लॅट दादरमध्ये आहे. वास्तविक हे घर पारशी कॉलनीत आहे, जी जगातील सर्वात मोठी पारशी कॉलनी आहे. या घरात राहणाऱ्या भाडेकरूने सांगितले की, तो 30 वर्षांपासून येथे राहत आहे.
हेही वाचा – Aries Yearly Horoscope 2024 : मेष राशीच्या लोकांसाठी २०२४ कसे राहील, जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य!
1300 स्क्वेअर फूट आकाराच्या या 2 BHK फ्लॅटचे भाडे 4300 रुपये प्रति महिना आहे. पारसी कॉलनी हे दक्षिण मुंबईतील एक विकसित ठिकाण आहे. हे मुंबईचे प्रमुख ठिकाण आहे. वडाळा रोड आणि दादर रेल्वे स्टेशन येथून हाकेच्या अंतरावर आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अंतर 14 किलोमीटर आहे.
भाडे का कमी आहे?
या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या भाडेकरूने सांगितले की, त्याला हा फ्लॅट पारशी पंचायतीकडून भाड्याने मिळाला होता. पारशी पंचायत ही नफा कमावणारी संस्था नसून गरजू लोकांना मदत करण्यासाठी तयार आहे, त्यामुळे हा फ्लॅट अल्प भाड्याने देण्यात आला आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!