मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली

WhatsApp Group

Onion Export Ban Lift : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने आता कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे. कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

देशातील कांद्याच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंत निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती, मात्र ही बंदी अंतिम मुदतीपूर्वीच हटवण्यात आली आहे. समितीने 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. यासोबतच बांगलादेशला 50,000 टन कांदा निर्यात करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

डिसेंबरमध्ये बंदी

देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि घाऊक किमती स्थिर ठेवण्यासाठी 7 डिसेंबर 2023 रोजी केंद्राने 31 मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने रविवारी कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, आता आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला भाव मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.

भाव 100 रुपये किलोवर पोहोचला होता

कांद्याच्या उत्पादनात घट झाल्याने भाव गगनाला भिडले होते, त्यामुळे सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. डिसेंबर महिन्यात कांद्याचे भाव 100 रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. सध्या सरकारने उचललेल्या पावलांमुळे भावात सातत्याने घसरण होत आहे.

हेही वाचा – Freehold Vs Leasehold Property : फ्रीहोल्ड की लीजहोल्ड? कोणती प्रॉपर्टी घेणं उत्तम?

कांदा निर्यातीवर बंदी घालण्याबरोबरच सरकारने लोकांना स्वस्त कांदा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक पावले उचलली होती. सरकारने बफर स्टॉकद्वारे 25 रुपये किलोने कांदा विकण्याची घोषणा केली होती.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment