अभिमानास्पद! महाराष्ट्र ठरलं देशातील सर्वात ‘स्वच्छ राज्य’, इंदूर आणि सुरत ‘स्वच्छ शहरे’

WhatsApp Group

केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात इंदूर आणि सुरत यांना देशातील ‘स्वच्छ शहरे’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत, तर नवी मुंबईने तिसरे स्थान कायम राखले. हे निकाल आज गुरुवारी जाहीर करण्यात आले. ‘स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023’ (Swachh Survekshan Awards 2023) मध्ये ‘सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या’ श्रेणीमध्ये, महाराष्ट्राने अव्वल क्रमांक पटकावला, त्यानंतर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा क्रमांक लागतो. गेल्या वेळी मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर होता.

इंदूरने सलग सातव्यांदा स्वच्छ शहराचा किताब पटकावला. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी आणि इतर कार्यक्रमाला उपस्थित होते.

हेही वाचा – स्टार क्रिकेटर संदीप लामिछाने 8 वर्ष जेलची हवा खाणार!

एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील सासवड प्रथम, छत्तीसगडचे पाटण द्वितीय आणि महाराष्ट्रातील लोणावळा तृतीय क्रमांकावर आहे. गंगेच्या काठावर वसलेल्या स्वच्छ शहरांमध्ये वाराणसी पहिल्या तर प्रयागराज दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावेळी एकूण 9500 गुणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील महूला सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट सफाईमित्र सेफ सिटी पुरस्कार चंदीगडला देण्यात आला.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment