

Car Seat Belt Mandatory In Mumbai : मुंबईत आता सीट बेल्ट लावणे अनिवार्य झाले आहे. याबाबतचा आदेश मुंबई पोलिसांनी जारी केला आहे. १ नोव्हेंबरपासून मुंबईत सीट बेल्ट न लावता वाहन चालवणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. मुंबई पोलिसांच्या आदेशात म्हटले आहे की, “जो कोणी सेफ्टी बेल्ट न लावता मोटार वाहन चालवतो किंवा सीट बेल्ट न लावता प्रवाशांना घेऊन जातो, तो दंडनीय असेल.”
सीट बेल्ट घालणे अनिवार्य
कारमधील प्रत्येकाने सीट बेल्ट बांधणे बंधनकारक आहे. मोटार वाहन कायद्याच्या कलम 194(b)(2) मध्ये असे म्हटले आहे की जर १४ वर्षांपेक्षा कमी वयाचे मूल कारमध्ये असेल तर त्याने सुरक्षा बेल्ट देखील घालणे आवश्यक आहे. तसे न केल्यास एक हजार रुपये दंड भरावा लागेल. १ सप्टेंबर २०२०२ रोजी, मोटार वाहन कायद्यात सुधारणा करून, सीट बेल्ट न घातल्याबद्दल चलनाची रक्कम १०० रुपयांवरून १००० रुपये करण्यात आली. कारमध्ये समोर बसलेल्या दोन्ही प्रवाशांना लागू होते. १९९३ मध्ये ड्रायव्हर आणि पुढच्या सीटवरील प्रवाशांना सीट बेल्ट घालणे बंधनकारक करण्यात आले होते. ऑक्टोबर २००२ मध्ये सरकारने मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट घालणे अनिवार्य केले.
हेही वाचा – दिवाळीत प्रवाशांसाठी चांगली बातमी..! एसटी सोडणार १४९४ जादा गाड्या
According to @MumbaiPolice, anyone not wearing a seatbelt in a car or has passengers not wearing a seatbelt shall be punished. pic.twitter.com/6TK1CCYELS
— Autocar India (@autocarindiamag) October 14, 2022
सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर बदल
सायरस मिस्त्री या सुप्रसिद्ध व्यावसायिकाचा ४ सप्टेंबर रोजी गुजरातहून मुंबईला परतत असताना कार अपघातात मृत्यू झाला. त्यावेळी मिस्त्री कारच्या मागील सीटवर बसले होते. त्यांनी सीट बेल्ट घातला नव्हता. महामार्गावरील एका भिंतीवर कार आदळली असता, मिस्त्री आणि त्यांच्यासोबत बसलेले जहांगीर पंडोले यांचे डोके सीटवर आदळल्याने त्यांचा मृत्यू झाला. यानंतर, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राजपत्र अधिसूचना जारी करून सर्व राज्यांना कारमध्ये मागील सीट बेल्ट लावणे अनिवार्य करण्याचे निर्देश दिले.