Bombay High Court On Husband Wife Dispute : पुराव्याशिवाय पतीची बदनामी करणे, त्याला व्यभिचारी आणि मद्यपी म्हणणे म्हणजे क्रूरता आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात म्हटले आहे. यासोबतच पुण्यातील दाम्पत्याचे लग्न मोडण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश न्यायालयाने कायम ठेवला. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने १२ ऑक्टोबर रोजी ५० वर्षीय महिलेचे अपील फेटाळत हा आदेश दिला. महिला याचिकाकर्त्याने नोव्हेंबर २००५ च्या पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान दिले होते, ज्याने ती आणि तिचा पती यांच्यातील विवाह विघटन करण्यास परवानगी दिली होती.
महिलेचा पती हा निवृत्त लष्करी कर्मचारी होता ज्याचा उच्च न्यायालयात खटला सुरू असताना मृत्यू झाला होता. त्यानंतर न्यायालयाने त्याच्या कायदेशीर वारसाला या प्रकरणात प्रतिवादी म्हणून समाविष्ट करण्याचे निर्देश दिले. महिलेने तिच्या अपीलात दावा केला होता की तिचा नवरा व्यभिचारी आणि मद्यपी होता, त्यामुळे तिला तिच्या वैवाहिक हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले होते. पत्नीने पतीच्या चारित्र्यावर अन्यायकारक आणि खोटे आरोप केले आहेत ज्यामुळे समाजात तिची प्रतिष्ठा खराब झाली आहे आणि ती क्रूरता आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे.
हेही वाचा – दु्दैवी घटना..! दृष्टिहीन मुलांच्या शाळेला आग; ११ जण दगावले!
The Bombay High Court has said defaming husband and calling him a womaniser and alcoholic without substantiating the allegations amount to cruelty.https://t.co/6fLLaSR4hf
— editorji (@editorji) October 25, 2022
उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले की, महिलेने तिच्या स्वत:च्या विधानाव्यतिरिक्त इतर आरोपांच्या समर्थनार्थ विश्वासार्ह पुरावे सादर केले नाहीत. याचिकाकर्त्या महिलेने पतीवर खोटे आणि बदनामीकारक आरोप करून मानसिक छळ केल्याचे मृताच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. उच्च न्यायालयाने पतीने कौटुंबिक न्यायालयासमोर दिलेल्या विधानाचा संदर्भ दिला ज्यामध्ये पत्नीने त्याला आपल्या मुलांपासून आणि नातवंडांपासून वेगळे केले असल्याचा दावा केला होता.