रायगडमध्ये भीषण अपघात..! ४८ विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटली, २ ठार!

WhatsApp Group

Maharashtra Raigad Bus Accident : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खोपोली शहराजवळील डोंगराळ भागात रविवारी रात्री बस पलटी होऊन दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर ४६ जण जखमी झाले. प्रथमदर्शनी ब्रेक फेल झाल्याने बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, लोणावळा हिल स्टेशनपासून सुमारे १४ किमी अंतरावर जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील मॅजिक पॉइंट हिलजवळ रात्री ८ वाजता ही घटना घडली. या अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून, त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर येथे उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – Horoscope Today : ‘या’ राशींच्या लोंकानी घाईघाईने निर्णय घेणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

उपनगरातील चेंबूरमधील एका कोचिंग क्लासचे किमान ४८ विद्यार्थी खासगी बसमधून प्रवास करत होते, असे त्यांनी सांगितले. हे सर्वजण दहावीचे विद्यार्थी असून पिकनिक आटोपून परतत असल्याचे त्यांनी सांगितले. “लोणावळा पिकनिकवरून परतत असताना, ब्रेक फेल झाल्याने खोपोलीजवळ घाट (हिल रोड) परिसरात बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले,” असे अधिकाऱ्याने सांगितले.

या अपघातात सर्व विद्यार्थी आणि चालक जखमी झाले असून त्यांना नंतर लोणावळा आणि खोपोली येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. अधिका-याने सांगितले की, १७ आणि १६ वयोगटातील दोन गंभीर जखमी विद्यार्थ्यांना उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आले. चेंबूर कॅम्प येथील हितिका खन्ना आणि घाटकोपर उपनगरातील असल्फा गावातील रहिवासी राज राजेश म्हात्रे (१६) अशी मृतांची नावे आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment