

Nandurbar Accident News : महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश रस्त्यांवर छोटे-मोठे अपघात होत आहेत. शनिवारी रात्री नंदुरबार जिल्ह्यातील चरणमाळ घाटात खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन ठार तर ४० प्रवासी जखमी झाले. मृतामध्ये बसचालकासह १८ महिन्याच्या एका चिमुरडीचा समावेश आहे. आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मुसळधार पावसामुळं मदतकार्यात अडथळे येत आहेत. ह बस पिंपळनेरहून सुरतला जात होती.
बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात
नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात चरणमाळ घाट आहे. हा घाट अरुंद असून अनेक ठिकाणी धोकादायक वळणं आहेत. त्यामुळेच पावसाळ्यात या घाटावरून मोठी वाहनं चालवणं कठीण होते. त्यात मुसळधार पावसामुळं अपघात होत आहेत. यात आता लक्झरी बसचा अपघात झाला आहे. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.
Bus accident in #Navapur area of Nandurbar district of Maharashtra There were 50 people in the bus Two killed and 40 injured in accident pic.twitter.com/WsmlCBTGNt
— RawNews1st🎥📰 (@Raw_News1st) September 11, 2022
बसमध्ये एकूण ५० प्रवासी
अपघातानंतर लगेचच जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते. यामध्ये किमान ८ ते १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच घाटापासून काही अंतरावर उपस्थित स्थानिक नागरिकांनी घाटाच्या दिशेनं धाव घेत मदत केली. बस खाली अडकलेल्या चालकाला मध्यरात्रीपर्यंत बाहेर काढण्याचं काम केलं जात होतं, जखमींना वाचवण्यात यश आले असून त्यांना तातडीने खासगी वाहनातून उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
याआधी नागपूर जिल्ह्यातही भीषण अपघात झाला होता. जेथे बाईकवरील चार जण उड्डाणपुलावरून सुमारे ७० ते ८० फूट उंचीवरून खाली पडले. त्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला. शहरातील सक्करदरा परिसरात ही घटना घडली होती.
हेही वाचा –
‘बाहुबली’ फेम प्रभासवर दु:खाचा डोंगर..! कुटुंबातील दिग्गज अभिनेत्याचं निधन
बाप रे बाप..! हेअर ड्रायरमधून आग निघताच आख्खं सलून पेटलं; पाहा शॉकिंग VIDEO!