शिर्डी साईबाबा मंदिराबद्दल ‘मोठी’ बातमी; देणग्यांवर Income Tax मधून सूट!

WhatsApp Group

Shirdi Sai Baba Trust : तुम्हीही आयकर भरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे की, ‘श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट’ निनावी देणग्यांवर कर सवलत देण्यास पात्र आहे, कारण ते धार्मिक आणि धर्मादाय ट्रस्ट आहे. श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट महाराष्ट्रातील शिर्डी येथील प्रसिद्ध मंदिराचे व्यवस्थापन करते.

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांच्या खंडपीठाने आयकर अपील न्यायाधिकरण (ITAT) च्या ऑक्टोबर 2023 च्या निर्णयाला आव्हान देणारे प्राप्तिकर विभागाने दाखल केलेले अपील फेटाळले. ट्रस्ट ही धर्मादाय आणि धार्मिक संस्था असल्याने त्याच्या बेनामी देणग्यांवर आयकर सवलत मिळण्यास पात्र आहे, असे निकालात म्हटले आहे.

उच्च न्यायालयाने न्यायाधिकरणाशी सहमती दर्शवली आणि म्हटले की संस्था धार्मिक आणि धर्मादाय ट्रस्ट आहे. त्यामुळे, अशा संस्थेला मिळालेली कोणतीही निनावी देणगी कर सवलतीच्या लाभासाठी पात्र/हक्क असेल. धार्मिक संस्थांना देणग्यांवर आयकर सूट देण्यासाठी आयकर कायद्याच्या कलम 80G मध्ये तरतूद आहे. परंतु अशी सूट मिळण्यासाठी काही अटी आहेत.

हेही वाचा – काम बोलतं सर…! सनथ जयसूर्या श्रीलंकेचा हेड कोच, आता ‘फुल टाइम’ कोचिंग

नियमांनुसार, देणगी प्राप्त करणारी संस्था भारत सरकार किंवा राज्य सरकारद्वारे नोंदणीकृत धर्मादाय संस्था असावी. याशिवाय दानाचा उद्देश धार्मिक, सामाजिक किंवा अन्य कल्याणकारी कार्य असावा. देणगीदाराने देणगीचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे, जे सेवाभावी संस्थेद्वारे जारी केले जाते. इन्कम टॅक्स रिटर्न भरताना हे प्रमाणपत्र जोडले जाते.

वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांसाठी देणगी मर्यादा बदलू शकतात. काही संस्थांना दिलेल्या देणग्यांवर 50% पर्यंत आयकर सूट मिळू शकते, तर काही संस्थांसाठी ही मर्यादा कमी असू शकते.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment