Video : राज ठाकरेंचा दणका..! कडक इशारा दिल्यानंतर BMC ची ‘त्या’ जागेवर मोठी कारवाई

WhatsApp Group

Mahim illegal Dargah : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी गुढीपाडव्याच्या भाषणात एक व्हिडिओ क्लिप सर्वांसमोर आणली  आणि दावा केला की मुंबईतील माहीम समुद्रकिनारी एक ‘बेकायदेशीर दर्गा’ तयार झाला आहे. ‘हा दर्गा कोणाचा? दोन वर्षांपूर्वी तो नव्हता. बेकायदा बांधकाम तातडीने पाडले नाही तर त्याच ठिकाणी भव्य गणपती मंदिर उभारू’, असा इशारा ठाकरेंनी यावेळी दिला.

त्यानंतर मुंबईतील माहीममधील बेकायदेशीर दर्गा पाडण्याची मोहीम गुरुवारी सुरू झाली. या व्हिडीओवर कारवाई करत शहर जिल्हाधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी करून अतिक्रमण काढण्यासाठी सहा सदस्यीय पथके तयार केली. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी मनसे कार्यकर्त्यांची बैठकही बोलावली होती.

याप्रकरणी राज्य सरकारने कोणतीही कारवाई न केल्यास मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याची मोहीम पुन्हा सुरू करू, असेही राज ठाकरे म्हणाले होते. ठाकरेंनी गेल्या वर्षी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर लावलेले सुमारे 17,000 खटले मागे घेण्याची मागणी केली होती.

मनसेच्या ट्विटर हँडलने दर्ग्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दिवसाढवळ्या समुद्राच्या मध्यभागी ‘नवीन हाजी अली’ तयार करण्यात येत असल्याचे म्हटले होते. मात्र पोलीस आणि पालिकेलाही त्याचा सुगावा लागला नाही.

हेही वाचा – IPhone 14 वर बंपर ऑफर..! 35 हजारांपेक्षा कमी किंमत; वाचा काय करावं लागेल!

व्हिडीओमध्ये काही खांबांसह किनार्‍याजवळ एक लहान बेट-प्रकारचा भूखंड दिसतो. या व्हिडिओमध्ये काही लोक समुद्राच्या पाण्यातून जाताना आणि प्रार्थना करताना दिसत आहेत. राज ठाकरेंनी हा ‘दर्गा’ असल्याचा दावा केला आहे. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, ‘देशाच्या संविधानाचे पालन करणाऱ्या मुस्लिमांना मला विचारायचे आहे. तुम्ही त्याचा निषेध करता का? मला कोणाकडेही झुकायचे नाही पण गरज पडेल तेव्हा ते करावेच लागेल. माहीम येथील मखदूम बाबाच्या दर्ग्याजवळ ‘बेकायदेशीर दर्गा’ असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

अनेक सोशल मीडिया युजर्सनी राज ठाकरेंनी दाखवलेले फुटेज शेअर केले आहेत. तर काहींनी दावा केला की, माहीमचा रहस्यमय दर्गा गुगल मॅपवरही उपलब्ध आहे. आपल्या भाषणात राज ठाकरे पुढे म्हणाले की, मला जावेद अख्तरसारखे मुस्लिम आवडतात, जे पाकिस्तानविरोधात बोलतात.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment