Kirit Somaiya Dance In CHYD : भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे आपल्या वक्तव्यांमुळे आणि आक्रमक कृत्यांमुळे चर्चेत असतात. सोमय्या विरोधी पक्षातील विविध नेत्यांवर अनेकदा टीका करताना दिसतात. राजकारणात सोमय्यांची हवा असतेच पण आता एका कार्यक्रमादरम्यान सोमय्यांच्या डान्सची हवा चर्चेचा विषय ठरत आहे. झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सोमय्या आले होते. या कार्यक्रमात त्यांनी सर्वांना आपल्या कृतीने चकित केले.
‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाला किरीट सोमय्या यांनी आपल्या पत्नीसह हजेरी नोंदवली. या शोच्या प्रोमोचा व्हिडिओ सध्या सोशल मिडिआवर व्हायरल होत आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर सोमय्या यांनी ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटातील ‘ढोलीडा’ गाण्यावर डान्स केला. गाणे वाजताच सोमय्या जागेवरुन उठतात आणि गरबा खेळायला लागतात. यात त्यांच्या पत्नीदेखील त्यांना साथ देतात. सोमय्यांचा डान्स पाहून परीक्षक स्वप्नील जोशीसह प्रेक्षकही अवाक् होतात. सर्वांनी सोमय्यांच्या या डान्सला पसंती दिली आहे. हा भाग प्रेक्षकांना १७ ऑक्टोबर रोजी पाहता येणार आहे.
हेही वाचा – “मुंबईत कुणीही झोपडपट्टीत राहणार नाही…”, राज्यपालांच्या बांधकाम व्यावसायिकांना सूचना!