मुख्यमंत्र्यांनंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा उद्धव ठाकरेंना झटका!

WhatsApp Group

Bhagat Singh Koshyari on MLC Nominations : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे. ठाकरे सरकारच्या काळात पाठवण्यात आलेल्या १२ नावांची यादी राज्यपालांनी रद्द केली आहे, ज्यांना विधान परिषदेवर उमेदवारी दिली जाणार होती. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून ही यादी रद्द करण्याची विनंती केली होती. एवढंच नाही तर त्यांच्या सरकारच्या वतीनं विधान परिषदेत नामनिर्देशनासाठी नवीन नावांची यादी पाठवण्याचं या पत्रात म्हटलं होतं.

राज्य सरकारची सूत्रं हाती घेतल्यानंतर एक वर्षानंतर, नोव्हेंबर २०२० मध्ये, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर नामनिर्देशनासाठी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे २० प्रतिष्ठित व्यक्तींची यादी सादर केली, त्यानंतर या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्यपाल कोश्यारी यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणून नामनिर्देशित १२ उमेदवारांची घोषणा करणं अपेक्षित होतं. मात्र, राज्यपाल कोश्यारी आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आमनेसामने असल्यानं या नियुक्त्यांबाबतचा निर्णय लांबणीवर पडला.

या नियुक्त्यांची घोषणा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील अनेक वरिष्ठ सदस्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती, परंतु राजभवनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर राज्यपालांनी या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. तथापि, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि एमव्हीए सरकारने विधान परिषदेचे सदस्य म्हणून पाठवलेल्या नावांची शिफारस केली नाही.

हेही वाचा – Asia Cup 2022 IND Vs PAK : बाबरसेनेकड़ून हिशोब बरोबर..! भारताला १८व्या ओव्हरमधील चूक नडली; पाकिस्तान विजयी!

या नियुक्त्यांची घोषणा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील अनेक वरिष्ठ सदस्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती, परंतु राजभवनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर राज्यपालांनी या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. तथापि, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि महाविकास आघाडी सरकारनं विधान परिषदेचे सदस्य म्हणून पाठवलेल्या नावांची शिफारस केली नाही.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार पडल्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी ३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याचवेळी ९ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात १८ मंत्र्यांचा सरकारमध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र, आता महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्याचा विस्तार ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळात आणखी २० मंत्र्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment