बीड हादरलं..! भाजप शहराध्यक्षानं डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपवलं; कारण…

WhatsApp Group

Beed BJP President Bhagirath Biyani Commits Suicide : महाराष्ट्रातील भाजप पक्षामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. बीडमध्ये भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. बीड शहरातील एमआयडीसी परिसरातील बियाणी यांच्या घरी आज सकाळी ही घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

बियाणी हे भाजपचे जुने कार्यकर्ते होते. सोमवारी रात्री उशिरापर्यंत त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा केली. मग ते त्यांच्या खोलीत जाऊन झोपले. रात्री उशिरापर्यंत दार न उघडले असता बियाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले कुटुंबीयांना दिसले. त्यांना तातडीने बीड शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा – जगातील एकमेव ‘शाकाहारी’ मगरीचा मृत्यू..! वय होतं ७५ वर्षे; पाहा VIDEO

तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह शेकडो अधिकारी रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती. आत्महत्येमागील कारण काय? पोलीस तपास करत असल्याचे सांगण्यात आले.

Leave a comment