Bank Holidays : आजच उरकून घ्या बँकेची कामं, 24 ऑगस्टपासून सलग तीन दिवस बँका बंद!

WhatsApp Group

Bank Holidays : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महिन्याच्या सुरुवातीला सुट्टीची यादी जाहीर केली जाते. शनिवारपासून म्हणजे 24 ऑगस्टपासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. या काळात तुमचे काही महत्त्वाचे काम असेल तर ते आजच पूर्ण करा. बँका बंद राहतील पण ऑनलाइन बँकिंगची (नेट बँकिंग) सुविधा सुरू राहील. चला तर मग जाणून घेऊया तीन दिवस बँका का बंद राहणार आहेत.

या आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये सलग 3 दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्यांमध्ये साप्ताहिक आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे. 24 ऑगस्टला चौथा शनिवार असल्याने बँकेला सुट्टी आहे. 25 ऑगस्ट रोजी रविवार आणि सोमवार 26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी असल्याने बँकांना साप्ताहिक सुटी असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत. 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत बँकेला सतत सुट्टी असेल. याशिवाय 31 ऑगस्ट (शनिवार) रोजीही बँका बंद राहणार आहेत.

हेही वाचा – “लाडकी बहीण योजना बंद तर होणारच नाही, भविष्यात दरमहा रकमेत वाढ करु”

तुम्हाला काही महत्त्वाच्या कामासाठी बँकेत जायचे असेल तर आजच जाण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला चेक किंवा ड्राफ्ट जमा करायचा असेल, नवीन खाते उघडायचे असेल किंवा तुमचे केवायसी बाकी असेल, तर आजच बँकेत जा आणि ही महत्त्वाची कामे पूर्ण करा.

तुम्ही बँकिंग ॲप किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे घरबसल्या फंड ट्रान्सफर, एफडी खाते उघडणे किंवा मिनी स्टेटमेंट यासारख्या सेवांचा लाभ घेऊ शकता. जर तुम्हाला पैसे काढायचे असतील तर तुम्ही एटीएम वापरू शकता. तथापि, चेक आणि ड्राफ्ट सारख्या सेवांसाठी तुम्हाला बँक उघडण्याची प्रतीक्षा करावी लागेल.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment