DA Hike For Bank Employees : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदभार स्वीकारताच बँक कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळाली आहे. देशभरातील लाखो बँक कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची भेट मिळाली आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 15.97 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. इंडियन बँक्स असोसिएशनने (IBA) 10 जून रोजी बँक कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता जाहीर केला. अधिसूचना जारी करून, मे, जून आणि जुलै 2024 साठी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 15.97% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आयबीएने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की मे, जून आणि जुलै 2024 साठी कामगार आणि अधिकाऱ्यांना देय असलेला महागाई भत्ता पगाराच्या 15.97 टक्के असेल. या वर्षी मार्चमध्ये IBA आणि बँक कर्मचारी संघटनांनी 17 टक्के वार्षिक पगारवाढीवर सहमती दर्शवली होती. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात या वाढीमुळे सरकारी बँकांवर सुमारे 8284 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा वाढणार आहे. त्याचबरोबर 8 लाख कर्मचाऱ्यांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.
हेही वाचा – Share Market मध्ये तेजी! सेन्सेक्सची 500 अंकांची उसळी, निफ्टीचा नवा विक्रम!
बँकांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय दर महिन्याला एक दिवसाची आजारी रजा घेण्याची मुभा देण्यात आली आहे. आयबीएने असेही म्हटले आहे की जे अधिकारी CAIIB (CAIIB भाग-II) उत्तीर्ण झाले आहेत ते 01.11.2022 पासून दोन वेतनवाढीसाठी पात्र असतील. पगाराची नवीन स्केल 48480 ते 173860 रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.
बँक कर्मचारी अनेक दिवसांपासून पाच दिवस काम करण्याची मागणी करत आहेत. याबाबत आयबीए आणि बँक कर्मचारी संघटनांमध्ये करार झाला असून आता सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. मार्च 2024 मध्ये संयुक्त घोषणेमध्ये असे म्हटले होते की, या अंतर्गत PSU बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून 5 दिवस काम करण्याचा प्रस्ताव आहे. शनिवारीही बँका बंद ठेवण्यात आल्या असून कर्मचाऱ्यांना सुटी देण्याची मागणी केली जात आहे. आता याबाबत सरकारच्या अधिसूचनेची प्रतीक्षा आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा