Thane Auto Driver Dragged Girl Student : महाराष्ट्रातील ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका रिक्षाचालकाने आधी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला आणि नंतर तिला सुमारे ५०० मीटरपर्यंत ओढले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तत्काळ कारवाई करत रिक्षाचालकाला अटक केली आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून युजर्सनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आरोपी रिक्षाचालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ठाण्यातील एका रिक्षाचालकाने २१ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला आणि नंतर तिला रिक्षासोबत ओढत नेले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. एका सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये एक ऑटो चालक महाविद्यालयीन विद्यार्थ्यासोबत कसा गैरवर्तन करत आहे हे दिसत आहे.
हेही वाचा – Robbie Coltrane Death : ‘हॅग्रिड’च्या निधनानंतर हॅरी पॉटरनं दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “मला भेटलेल्या…”
Update: A shocking incident outside #Thane railway station,rickshaw driver molested the #college girl.#auto driver forcefully dragged a girl into the auto and molested her right outside Thane railway station
A case has been registered at #Thane Nagar police station#Mumbai pic.twitter.com/5TrxxeBSCt
— Siraj Noorani (@sirajnoorani) October 14, 2022
रिक्षाचालक विद्यार्थिनीला जबरदस्तीने ऑटोमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचे सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे. रिक्षाचालकाने भरदिवसा विद्यार्थिनीचा विनयभंग केला. मुलगी रस्त्याच्या कडेला उभी आहे. मग ऑटोचालक तिचा हात पकडून ओढू लागतो. तेव्हा तो रिक्षाही चालवतो आणि मुलीला ओढू लागतो. कारवाई करत पोलिसांनी या रिक्षाचालकाला मुंबईहून ठाण्यात अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.