Bindas Kavya found in MP : यूट्यूब आणि सोशल मीडियावर लाखो फॅन्स असलेल्या यूट्यूबर बिंदास काव्या अखेर सापडली आहे. मध्य प्रदेशातील इटारसी इथं काव्या सापडली आहे. ती मनमाडहून लखनऊला जात होती. कालपासून ती महाराष्ट्रातील औरंगाबाद येथून बेपत्ता होती. तिची बेपत्ता झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. काव्याच्या आईनं छावणी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी दुपारी दोन वाजता ती घरातून बेपत्ता झाली.
आज १० सप्टेंबरला काव्याला शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. बिंदास काव्याचे यूट्यूबवर ४.३२ मिलियन सदस्य आहेत. ४३ लाख फॉलोअर्स असलेल्या काव्याचे फेसबुकवरही चांगले फॅन फॉलोइंग आहे. ती बेपत्ता झाल्यानंतर सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स तिच्यासाठी प्रार्थना करत होते. काव्याच्या भेटीच्या वृत्तानं त्या चाहत्यांची चिंता दूर झाली आहे.
हेही वाचा – VIDEO : चाहत्यानं केलं असं काही की हृतिक रोशन भडकला..! म्हणाला, “क्या कर रहा रहा है?”
काव्याच्या पालकांनी शेअर केला होता व्हिडिओ
यापूर्वी काव्याच्या पालकांनी १९.२२ मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून काव्याच्या पालकांनी तिला शोधण्याची विनंती केली होती. काव्याच्या पालकांनी हा व्हिडिओ तिच्या व्हेरिफाईड यूट्यूब अकाउंटवर अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी काव्या बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती.
या व्हिडिओमध्ये काव्याचे आई-वडील खूपच चिंतेत दिसत होते. व्हिडिओमध्ये आई रडत होती. काव्याच्या वडिलांनी लोकांना काव्याबद्दल काही माहिती असल्यास त्वरित कळवावे, असं आवाहनही केलं होतं.
कोण आहे बिंदास काव्या!
बिंदास काव्या यूट्यूबवर ट्रॅव्हल ब्लॉगिंग करते. आतापर्यंत 4४३3 लाखांहून अधिक लोकांनी तिच्या चॅनलला सबस्क्राइब केलं आहे आणि त्याहून अधिक लोकांनी त्याचा व्हिडिओ पाहिला आहे. काव्या २०१७ पासून यूट्यूब चॅनलवर सक्रिय आहे. गेल्या पाच वर्षांत तिनं यूट्यूब चॅनलवर वेगळी ओळख निर्माण केली आहे. आई-वडिलांच्या मदतीनं ती स्वतःचे यूट्यूब चॅनल चालवते. रागाच्या भरात ती घरातून निघून गेल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं.