“रात्री 10 वाजता खोलीत गेले आणि…”, नितीन देसाईंच्या बॉडीगार्डने सांगितली घटना!

WhatsApp Group

Nitin Desai : चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. त्यांनी बुधवारी सकाळी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

स्टुडिओत आत्महत्या

नितीन देसाई त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये मृतावस्थेत आढळले. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओमध्ये पहाटे साडेचार वाजता गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूचे कारण आर्थिक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन देसाई काल रात्री दहा वाजता त्यांच्या खोलीत गेले होते. आज सकाळी ते बराच वेळ खोलीच्या बाहेर आले नाहीत. त्यानंतर त्यांचा बॉडीगार्ड आणि इतर लोकांनी दरवाजा ठोठावला, मात्र कोणीही दरवाजा उघडला नाही. खिडकीतून पाहिल्यावर नितीन देसाई यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

हेही वाचा – Horoscope Today : कर्क आणि तूळसह ‘या’ ४ राशीचे लोक भाग्यशाली, वाचा आजचे दैनिक राशीभविष्य

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नितीन देसाई 9 ऑगस्ट रोजी त्यांचा 58 वा वाढदिवस साजरा करणार होते, मात्र खेदाची गोष्ट म्हणजे वाढदिवसापूर्वीच त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

नितीन देसाईंनी 1989 मध्ये ‘परिंदा’ या चित्रपटातून कला दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांचे सेट तयार केले होते. त्यांनी डिझाइन केलेल्या प्रसिद्ध चित्रपटांच्या सेटमध्ये प्यार तो होना ही था, हम दिल दे चुके सनम, मिशन कश्मीर, राजू चाचा, देवदास, लगान, बाजीराव मस्तानी यांचा समावेश आहे. बिग बॉसचा सेटही त्यांनीच डिझाइन केला होता. 2005 मध्ये त्यांनी मुंबईजवळ कर्जतमध्ये 52 एकरमध्ये पसरलेला एनडी स्टुडिओ उघडला.

4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार

नितीन देसाई यांना सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक म्हणून 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. याशिवाय त्यांना तीन वेळा फिल्मफेअर आधारित कला दिग्दर्शन पुरस्कारही मिळाला.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1999)
  • हम दिल दे चुके सनम (2000)
  • लगान (2002)
  • देवदास (2003)

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment