India’s First Apple Store : आयफोन निर्माता Apple चे भारतातील पहिले रिटेल स्टोअर मंगळवारी (18 एप्रिल, 2023) भारताची आर्थिक राजधानी मुंबईत उघडले. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी या अॅपल स्टोअरचे उद्घाटन केले. ऍपल स्टोअरच्या बाहेर उभ्या असलेल्या ग्राहकांशी हस्तांदोलन करून कुक यांचे स्वागत करण्यात आले. यासोबतच त्यांनी तेथे आलेल्या ग्राहकांसोबत सेल्फीही काढले.
ऍपल स्टोअर विशेष वैशिष्ट्ये
- Apple Store खूप खास असेल कारण ते पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालेल. यासाठी कंपनीकडून सोलर पॅनलही बसवण्यात आले आहेत. अॅपलच्या निवेदनात असेही म्हटले आहे की हे स्टोअर पूर्णपणे कार्बन न्यूट्रल असेल.
- Apple BKC मध्ये ग्राहकांचा अनुभव वाढवण्यासाठी 100 कर्मचारी असतील आणि ते 20 वेगवेगळ्या भाषा बोलू शकतील. या स्टोअरमध्ये ग्राहकांना अॅपल पिकअप सेवाही दिली जाणार आहे. म्हणजेच ग्राहक घरबसल्या ऑर्डर करू शकतात आणि अॅपल स्टोअरमध्ये येऊन पिकअप करू शकतात
First Apple Store in India at BKC, Mumbai. 📍 pic.twitter.com/zPPWDq90eD
— TrakinTech (@TrakinTech) April 17, 2023
हेही वाचा – ‘या’ ३० आमदारांसह पवार भाजपात जाणार? महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप?
#CNBCBajar| Tim Cookની હાજરીમાં મુંબઈના BKC ખાતે ભારતનો સર્વપ્રથમ Appleનો રીટેલ સ્ટોર ખુલ્યો @tim_cook #applestoremumbai #applebkc #AppleStore #Mumbai #JioWorlddrive #iPhone #iPad #MacBook #Apple pic.twitter.com/SyfP8JVfB7
— CNBC Bajar (@CNBCBajar) April 18, 2023
- अॅपलच्या स्टोअरची रचना मुंबईतील प्रसिद्ध काळ्या-पिवळ्या टॅक्सींवर आधारित आहे.
- Apple ने भारतात 25 वर्षे पूर्ण केली आहेत. अशा परिस्थितीत कंपनीचे हे रिटेल स्टोअर खूप खास आहे.
- अॅपलसाठी भारतीय बाजारपेठ खूप महत्त्वाची बनली आहे, कारण ही काही मोजक्या बाजारपेठांपैकी एक आहे जिथे कंपनीचा महसूल दुहेरी अंकात वाढत आहे.
- मुंबईनंतर अॅपलचे दुसरे स्टोअर दिल्लीतील साकेत येथे 20 एप्रिल रोजी सुरू होणार आहे. अॅपलच्या दोन्ही स्टोअरमध्ये ग्राहकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!