Andheri Bypoll Election Result 2022 : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके विजयी झाल्या आहेत. महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल आज समोर आले. रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. बीएमसीच्या माजी कर्मचारी ऋतुजा लटके यांना बाला नाडर (आपकी अपनी पार्टी), मनोज कुमार नायक (राइट टू रिकॉल पार्टी) आणि फरहान सय्यद, नीना खेडेकर, मिलिंद कांबळे आणि राजेश त्रिपाठी या चार अपक्षांचे आव्हान होते. ऋतुजा लटके यांना ६० हजारांहून अधिक मते मिळाली आहेत.
ऋतुजा लटके यांनी विजयानंतर सांगितले की, भाजपकडून कोणतीही सहानुभूती मिळालेली नाही. निवडणुकीपूर्वी त्यांनी सर्वेक्षण केले होते. भाजपचा पराभव होत आहे हे त्यांना माहीत होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला. हा माझा विजय नाही. हा विजय माझे दिवंगत पती रमेश लटके यांचा विजय आहे. सर्वप्रथम मी रमेश लटके यांची अपूर्ण विकासकामे पूर्ण करीन. मी मातोश्रीवर जाईन. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मनःपूर्वक आभार. विजयाबद्दल कोणताही उत्सव होणार नाही.
हेही वाचा – IND Vs ZIM : रोहित शर्मानं जिंकला टॉस; टीम इंडियामध्ये आज ‘एक’ बदल!
आदित्य ठाकरेंचे ट्वीट
ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ”आज अंधेरी पोटनिवडणूकीत जो विजय मिळाला तो स्व. रमेश लटके जी यांच्या कार्याचा आहे, निष्ठेचा आहे, शिवसैनिकांच्या जिद्दीचा आहे आणि शिवसेनेवर, उद्धवसाहेबांवर जनतेच्या असलेल्या दृढ विश्वासाचा आहे! ह्या विजयातून निर्माण झालेली उर्जेची लाट महाराष्ट्रभर पसरेल याची खात्री आहे!”
आज अंधेरी पोटनिवडणूकीत जो विजय मिळाला तो स्व. रमेश लटके जी यांच्या कार्याचा आहे, निष्ठेचा आहे, शिवसैनिकांच्या जिद्दीचा आहे आणि शिवसेनेवर, उद्धवसाहेबांवर जनतेच्या असलेल्या दृढ विश्वासाचा आहे!
ह्या विजयातून निर्माण झालेली उर्जेची लाट महाराष्ट्रभर पसरेल याची खात्री आहे! pic.twitter.com/aOXJ81dtXt— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 6, 2022